दुष्काळात तेरावा: हंगाम सुरु होऊनही द्राक्ष निर्यातीला कशाचा अडसर? नैसर्गिक संकटानंतरही समस्या कायम

द्राक्ष बागा जोमात असताना निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम काय असतो याची अनुभती फळबागायतदार शेतकऱ्यांना आली होती. अवकाळी, अतिवृष्टी, गारपिट आणि हे कमी म्हणून की काय अंतिम टप्प्यात वाढलेली थंडी. अशा एक ना अनेक संकटावर मात करीत अखेर शेतकऱ्यांनी द्राक्ष पदरात तर पाडून घेतले पण त्यानंतरही संकटाने काही पाठ सोडलेली नाही. आता सांगली आणि नाशिक या मुख्य आगारातून द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली आहे पण संथ गतीने.

दुष्काळात तेरावा: हंगाम सुरु होऊनही द्राक्ष निर्यातीला कशाचा अडसर? नैसर्गिक संकटानंतरही समस्या कायम
वातावरणातील बदलामुळे आता खराब द्राक्षाचे बेदाण्याचे उत्पादन घेतले जाणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 3:04 PM

सांगली : द्राक्ष बागा जोमात असताना (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम काय असतो याची अनुभती फळबागायतदार शेतकऱ्यांना आली होती. अवकाळी, अतिवृष्टी, गारपिट आणि हे कमी म्हणून की काय अंतिम टप्प्यात वाढलेली थंडी. अशा एक ना अनेक संकटावर मात करीत अखेर शेतकऱ्यांनी (Grape) द्राक्ष पदरात तर पाडून घेतले पण त्यानंतरही संकटाने काही पाठ सोडलेली नाही. आता सांगली आणि नाशिक या मुख्य आगारातून (Grape Export) द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली आहे पण संथ गतीने. यासाठीही मध्यंतरी वातावरणातील बदल हेच कारण ठरत आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्षात गोडवाच उतरत नसल्याने मागणीत घट होऊ लागली आहे. सांगली जिल्ह्यातून युरोपसह अखाती देशात 3 हजार 360 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. वातावरण बदलाने झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या थेट उत्पन्नावर परिणाम करताना दिसत आहे.

द्राक्ष मण्यांची फुगवणही नाही

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात सकाळी थंडी आणि धुके पडत आहे. यामुळेच द्राक्षांची अंतिम टप्प्यात वाढ होत नाही शिवाय द्राक्षामध्ये गोडवाच उतरत नाही. एकंदरीत द्राक्षाच्या दर्जावर परिणाम होऊ लागल्याने क्विलिटी चेकींगमध्ये ही द्राक्ष निर्यातीसाठी योग्य नसल्याचे सांगितले जात आहे. शिवाय द्राक्ष मण्यांची अपेक्षित फुगवणही होत नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली असली तरी दरवर्षीसारखी वर्दळ आणि उत्साह नसल्याचे चित्र आहे.

3 हजार टन द्राक्षांची निर्यात

सांगली जिल्ह्यातील द्राक्षांना विशेषत: युरोप आणि आखाती देशासह रशिया मलेशिया या देशातून मागणी असते. यंदा निर्यातच सुरु होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते पण अखेर याला सुरवात झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरवात झाली असली तो वेग आलेला नाही. आतापर्यंत युरोपीय देशांमध्ये 869 टन, आखाती देशासह इतर देशांमध्ये 2 हजार 490 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही निर्यात कमी असून असेच वातावरण राहिले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यंदा सर्वकाही निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले आहे.

कृषी विभाग मात्र आशादायी

निर्यातीमध्ये घट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आहेत. पण आगामी काळात वातावरण निवाळल्यावर द्राक्ष निर्यातीला गती येईल असा विश्वास कृषी विभागाला आहे. द्राक्षाला मागणी आहे पण मुळात मालच त्या प्रतीचा नसल्याने अडसर निर्माण होत आहे. यंदा रशियातून चांगली मागणी असून काही दिवसांनी निर्यात वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

Soybean Rate: सोयाबीनचे दर स्थिर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय..!

‘जलयुक्त’योजनेतील पाणी परळीतच ‘मुरलं’ अन् चौकशीत ते बाहेरही ‘आलं’, कृषी सहसंचालकानीच दिले वसुलीचे आदेश

अभिमानास्पद..! फलोत्पादन निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर ‘वन’, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.