यशस्वी वांग्यांची शेती, लाखो रुपयांचं उत्पन्न, नियोजन करा आणि पैसे कमवा

दूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती परवडत नाही. यासाठी भाजीपाल्याची शेती न करता कापूस, पपई, केळी, मिरची, ऊस, अशा पिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात.

यशस्वी वांग्यांची शेती, लाखो रुपयांचं उत्पन्न, नियोजन करा आणि पैसे कमवा
वांग्याची लागवडImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 10:52 AM

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : जिल्ह्यात सातत्याने होणारा अवकाळी पाऊस (unseasonal rain) आणि चक्रीवादळ मुळे शेतकऱ्यांच्या (farmer) प्रचंड नुकसान होत आहे. मात्र या सर्व संकटांवर मात देत नंदुरबार तालुक्यातील विजय माळी या शेतकऱ्यांनी वांग्यांची यशस्वी शेती करून दाखवली आहे. लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. त्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे त्यांचं इतर शेतकऱ्यांनी कौतुक केलं आहे. शेतीमध्ये योग्य पाण्याच्या, खताचा नियोजन आणि मेहनत केली की सर्व शक्य असतं, याचं उत्तम उदाहरण नंदुरबार शहरातील माळीवाडा येथे राहणाऱ्या विजय माळी हे आहेत. या विजय माळी यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर मेघना या वांग्यांच्या वाणाची लागवड (cultivation) केली होती, यासाठी त्यांनी एक लाख तीस हजार रुपये खर्च करून आतापर्यंत अडीच लाखांपर्यंचे उत्पन्न घेतले असून, अजून एका लाखाचे वांगे विकण्याची शक्यता आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती परवडत नाही. यासाठी भाजीपाल्याची शेती न करता कापूस, पपई, केळी, मिरची, ऊस, अशा पिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात. परंतु भाजीपाल्याची शेतीसाठी योग्य पाण्याच्या आणि वेळेवर खतांची फवारणी केल्याने याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होत असतो. नंदुरबार बाजारपेठेत वांग्याला १२ ते १५ रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करत आहे. तर बाजारपेठ जवळच असल्याने वाहतुकीच्या खर्च देखील लागत असल्याने शेतकऱ्यांना याच्या मोठा फायदा होत आहे.

हे सुद्धा वाचा

शेती परवडत नाही असे अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते. परंतु योग्य नियोजन राहिलं, तर भाजीपाल्यांच्या शेतीतून लाखो रुपयांच्या याच्यात नफा देखील येऊ शकतो, विजय माळी या शेतकऱ्यांसारखे अनेक शेतकऱ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने शेती केली, तर कधीही शेतकरी उपाशी राहणार नाही. सध्या शेतकरी खरीपपूर्व मशागत करीत आहे, काही शेतकऱ्यांनी सगळी काम उरकली असून पावसाची वाट पाहत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.