Cotton : कापसाचेच नव्हं यंदा तर फरदडचेही सोनं, अंतिम टप्प्यातही Market ‘भारीच’
मागणी असली की त्या मालाच्या दर्जाला महत्व न देता पुरवठा किती होतोय यावरच लक्ष केंद्रीत केलं जातं. तसंच काहीसं यंदा कापसाच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत आहे. यंदाच्या हंगामात सुरवातीपासून या पांढऱ्या सोन्याने आपलं महत्व टिकवून ठेवलेलं आहे. हंगामात यंदा 11 हजारचा विक्रमी दर मिळाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात कापूस हा 10 हजार 700 रुपयांवर स्थिरावलेला आहे. आता मुख्य पिकाची आवक घटली असून सध्या फरदडचा कापूस बाजारात दाखल होत आहे.
परभणी : मागणी असली की त्या मालाच्या दर्जाला महत्व न देता पुरवठा किती होतोय यावरच लक्ष केंद्रीत केलं जातं. तसंच काहीसं यंदा (Cotton Crop) कापसाच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत आहे. यंदाच्या (Kharif Season) हंगामात सुरवातीपासून या पांढऱ्या सोन्याने आपलं महत्व टिकवून ठेवलेलं आहे. हंगामात यंदा 11 हजारचा विक्रमी दर मिळाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात कापूस हा 10 हजार 700 रुपयांवर स्थिरावलेला आहे. आता मुख्य पिकाची आवक घटली असून सध्या फरदडचा कापूस (Parbhani Market) परभणी बाजारात दाखल होत आहे. कापसाला अधिकचे दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीचा विचार न करता उपलब्ध पाण्यावर फरदडचे उत्पादन घेतले होते. या फरदड कापसालाही 10 हजार 500 पर्यंतचा भाव परभणी कृषी उत्पन्न मिळत आहे.त्यामुळे मागणी असल्यावर फरदडचेही सोनं होत याचा प्रत्यय येत आहे.
फरदड कापूस म्हणजे काय?
फरदड कापूस म्हणजे हंगाम संपूनही अधिकच्या उत्पादनासाठी कापसाला पाणी देऊन उत्पादन घेणे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. शिवाय यंदा खरिपातील एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते. मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे कापूस मोडणीपेक्षा त्याची जोपासना केली तर आर्थिक लाभ शेतकऱ्यांना होत आहे. तीन ते चार वेचण्या पूर्ण झाल्यानंतरही कापूस शेतामध्ये ठेऊन पाणी देऊन कापसाचे उत्पादनव घेतले जाते.
सरासरी 8 हजार 200 चा भाव
फरडद कापसाचा दर्जाही चांगला असतो असे नाही. पण कापसाची मागणी वाढत आहे. शिवाय कापूस हंगाम अंतिम टप्यात असून साठवूकीतल्या कापसाची शेतकऱ्यांनी विक्री केलेली आहे. दरवर्षी जो दर चांगल्या कापसाला नसतो तो यंदा फरदडला मिळत आहे. सध्या बाजारपेठेत फरदडचीच आवक होत आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात नव्या पिकांचा प्रयोग केलाच नाही तर फरदडचेच उत्पादन घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे इतर पिकांना जो दर नाही तो आता फरदड कापसाला मिळत आहे.
फरदडमुळे नुकसान काय?
कापसाचे पीक अधिकचे काळ शेतामध्ये उभे असल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. या बोंडअळीमुळे इतर पीकेही प्रभावित होतात. एकंदरीत रब्बी हंगामातील पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव हा वाढतो. शिवाय या पिकामुळे शेतजमिनही नापिक होते. हे सर्व नुकसान होत असतानाही वाढीव दरामुळे शेतकऱ्यांनी याचे उत्पादन घेण्याचे धाडस केले आहे.
संबंधित बातम्या :
E-Pik Pahani : ‘ई-पीक पाहणी’तूनच आता खरेदीची होणार नोंदणी, शेतकऱ्यांच्या समस्येवर रामबाण उपाय
Green Fodder : उन्हाळ्यात चवळी चारा पिकाचा आधार, हिरवा चारा अन् दूध उत्पादनातही वाढ