Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Crop : आवक घटूनही कांद्याचा वांदाच, खरिपात साधले उन्हाळी कांद्याचे गणितच बिघडले

कांद्याच्या दराचा लहरीपणा शेतकऱ्यांना माहिती असूनही दिवसेंदिवस कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कधी फायदा तर कधी तोटा हे ठरलेले असतानाही खरीप आणि उन्हाळी हंगामात या पिकाचे उत्पादन वाढत आहे. सध्या बाजारपेठेत उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, सोलापूर या मुख्य बाजार समित्यांबरोबरच खेड येथील बाजार समितीच्या चाकण मार्केटध्येही कांद्याची आवक सुरु आहे. पण खरिपातील लाल कांदा संपल्यानंतर दरात सुरु झालेली घसरण अद्यापही कायम आहे.

Onion Crop : आवक घटूनही कांद्याचा वांदाच, खरिपात साधले उन्हाळी कांद्याचे गणितच बिघडले
उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने सोलापुरात कांद्याला 1 रुपया किलो असा दर मिळला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 9:29 AM

पुणे :  (Onion Rate) कांद्याच्या दराचा लहरीपणा शेतकऱ्यांना माहिती असूनही दिवसेंदिवस कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कधी फायदा तर कधी तोटा हे ठरलेले असतानाही खरीप आणि (Summer Crop) उन्हाळी हंगामात या पिकाचे उत्पादन वाढत आहे. सध्या बाजारपेठेत उन्हाळी हंगामातील (Onion Arrival) कांद्याची आवक सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, सोलापूर या मुख्य बाजार समित्यांबरोबरच खेड येथील बाजार समितीच्या चाकण मार्केटध्येही कांद्याची आवक सुरु आहे. पण खरिपातील लाल कांदा संपल्यानंतर दरात सुरु झालेली घसरण अद्यापही कायम आहे. सरासरी 800 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. गेल्या 15 दिवसांच्या तुलनेत पुन्हा कांदा दरात 20 रुपयांची घट झाली आहे. विशेष म्हणजे कांद्याची आवक कमी असतना ही परस्थिती ओढावली आहे.

उन्हाळी हंगामातील कांदा ‘फेल’

सध्या सर्वच हंगामी पिकांना सरासरीपेक्षा अधिकचा दर मिळत आहे. यामध्ये वाढत्या उन्हाचा प्रभाव असला तरी कांद्याने मात्र, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कारण महिन्याभरापूर्वी कांद्याचे दर हे 3 हजार रुपये क्विंटल असे होते. शिवाय खरिपातील लाल कांदा अंतिम टप्प्यात असल्याने कांद्याचे दर असेत तेजीत राहतील असे अंदाज होते. पण कांदा दराने पुन्हा आपला लहरीपणा दाखवला आहे. अवघ्या महिन्याभरातच 3 हजारावर असलेला कांदा थेट 800 रुपयांवर येऊन ठेपला आहे. शिवाय कांदा हा नाशवंत असल्याने शेतकऱ्यांना त्याची विक्री केल्याशिवाय पर्यायच नाही.

खेडमध्ये दिवसाकाठी 8 हजार क्विंटलची आवक

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये दिवसाकाठी साधारणत: 8 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. मात्र, बाजारपेठेत मागणीच नसल्याने कांद्याचे दर 800 रुपये क्विंटलवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूकीचा खर्चही परवडत नाही. मात्र, कांद्याचे क्षेत्र रिकामे करुन इतर पीक पेऱ्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. गेल्या 15 दिवसांच्या तुलनेत कांदा दरात 20 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे खरिपात साधले पण उत्पादन घटले होते आता उन्हाळी हंगामात उत्पादनात वाढ झाली पण कवडीमोल दर मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

निसर्गाच्या लहरीपणातून ज्या शेतकऱ्यांचा खरिपाचा कांदा बचावला होता त्यांना सर्वाधिक दर मिळाला. मात्र, उन्हाळी हंगामाची सुरवात झाली दरात घसरण सुरु झाली आहे. शिवाय नाफेडनेही साठवणूकीतला कांदा बाजारपेठेत दाखल केला होता. त्याचा परिणामही दरावर झाला आहे. खरिपात उत्पादन घट तर रब्बीत कवडीमोल किंमत काहीही झाले तरी नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच होत आहे.काही शेतकरी यावर पर्याय म्हणून कांदा चाळीचा आधार घेऊ लागले आहेत.

संबंधित बातम्या :

Income Tax | श्रीमंत शेतकरी प्राप्तीकर विभागाच्या रडारवर; उत्पन्न जास्त असेल तर कर भरावा लागणार?

State Government: आता मागूनही मिळणार नाही शेततळे, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, उत्पादन वाढूनही दर नियंत्रणात, भविष्यात काय होणार बदल?

प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.