Animal Husbandry Business: शेती जोडव्यवसायाला सरकारचे पाठबळ, किसान क्रेडीट कार्डवरही Loan
ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत आणि पशूपालनाचा व्यवसाय वाढवायचा आहे अशा शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या बॅंकेत पशू किसान क्रेडिट कार्ड होे बनवून घ्यावे लागणार आहे. अर्जामध्ये विचारलेली माहिती अचूक भरावी लागणार आहे. शिवाय आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
मुंबई : केवळ (Farming) शेती व्यवसायातूनच नाहीतर त्याच्या जोडव्यवसायातूनही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने केंद्र धोरण आखत आहे. त्यामुळेच आता (KCC) किसान क्रेडिट हे पशूपालन करणारे शेतकरीही बनवून घेऊ शकणार आहेत. याचा फायदा म्हणजे सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे. जर तुम्ही (Animal Husbandry) पशूपालनाचा व्यवसाय करता आणि आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असेल तर या कार्डच्या माध्यमातून 3 लाखापर्यंत 4 व्याजाने कर्ज घेता येणार आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. या राज्यात 1 हजार कोटींहून अधिक रक्कम ही पशूसंवर्धनासाठी देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे असतील त्यांना कागदपत्रे ही बॅंकेत जमा करावी लागणार आहेत तर त्यानंतर महिनाभरात कर्ज स्वरुपात पैसे मिळणार आहेत. गाय, म्हैस आणि शेळ्यांसाठी वेगळी अशी रक्कम ठरवून देण्यात आली आहे. एकट्या हरियाणा राज्यात 80 हजार जणांनी याचा लाभ घेतला आहे.
अशी आहे अर्ज करण्याची प्रक्रिया
ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत आणि पशूपालनाचा व्यवसाय वाढवायचा आहे अशा शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या बॅंकेत पशू किसान क्रेडिट कार्ड होे बनवून घ्यावे लागणार आहे. अर्जामध्ये विचारलेली माहिती अचूक भरावी लागणार आहे. शिवाय आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. यानंतर बॅंक अधिकाऱ्यांकडून तुमचा अर्ज तपासणी होते.अर्जामध्ये दिलेली माहिती योग्य असेल तर महिन्याभरात संबंधिताला पशू क्रेडिट कार्ड मिळते. या योजनेअंतर्गत पहिल्या 6 महिन्यामध्ये पैसे दिले जातात.
कसे असते व्याजदर?
हरियाणा राज्यातील अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. तेथील पशूसंवर्धन मंत्री जे.पी. दलाल यांच्या मते राज्यातील 16 लाख कुटुंबियांकडे 36 लाख जनावरे आहेत. तर यामधील 8 लाख नागरिकांना अॅनिमल किसान क्रेडिट कार्ड देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, अद्याप दहा लाख लाभार्थीही आलेले नाहीत. जे शेतकरी वेळेवर पैसे अदा करतात त्यांना 3 लाख रुपये हे केवळ 4 व्याजाने पैसे मिळतात.यामध्ये लाभार्थ्यास केवळ 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतची आवश्यकता असेल तर कोणत्याही प्रकारची हमी देण्याची आवश्यकता भासणार नाही.अशाप्रकारे 1 लाख 25 शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे.
पशूधनाप्रमाणे रक्कम
60 हजार 249 रुपये हे एका म्हशीसाठी तर एका गायीसाठी 40 हजार 783 रुपये मिळतात. मेंढी आणि शेळीसाठी 4 हजार 63 रुपये तर कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना एका कोंबडीसाठी 720 रुपये प्रमाणे पैसे मिळतात. यामुळे शेतीच्या जोडव्यवसायाला मोठा हातभार मिळत आहे.
या कागदपत्रांची गरज आहे.
*आधार कार्ड आणि पॅन कार्ड . *पासपोर्ट साइज फोटो. *अर्ज भरल्यानंतर केवायसी केली जाणार आहे. *ज्या जनावरांचे कर्ज आवश्यक आहे, त्यांचे आरोग्य प्रमाणपत्र . *मूळ रहिवाशी प्रमाणपत्र