Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grape Export : सांगलीतून 8 हजार टन द्राक्षाची निर्यात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या काय आहेत अपेक्षा?

जिथे हंगामाच्या सुरवातीपासूनच द्राक्ष बागा कोमात होत्या त्यामुळे यंदा निर्यातही जोमात झालेली नाही. यंदाचे वर्ष तसे नुकासनीचेच ठरले आहे. असे असतानाही सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीची प्रक्रिया ही सुरुच आहे. आतापर्यंत 8 हजार टन द्राक्षाची निर्यात झालेली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्यात योग्य द्राक्ष करण्यासाठी शेतकऱ्यांना अथक परीश्रम करावे लागले होते.

Grape Export : सांगलीतून 8 हजार टन द्राक्षाची निर्यात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या काय आहेत अपेक्षा?
द्राक्षाची निर्यात सुरु आहे पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 10:41 AM

सांगली : जिथे हंगामाच्या सुरवातीपासूनच (Grape Production) द्राक्ष बागा कोमात होत्या त्यामुळे यंदा निर्यातही जोमात झालेली नाही. यंदाचे वर्ष तसे नुकासनीचेच ठरले आहे. असे असतानाही (Sangli District सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीची प्रक्रिया ही सुरुच आहे. आतापर्यंत 8 हजार टन (Grape Export) द्राक्षाची निर्यात झालेली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्यात योग्य द्राक्ष करण्यासाठी शेतकऱ्यांना अथक परीश्रम करावे लागले होते. तेव्हा कुठे निर्यातीला सुरवात झाली असून परकीय चलन शेतकऱ्यांन मिळू लागले आहे. यातच यंदा चीनला द्राक्षाची निर्यात झाली नाही त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. सध्या निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना किमान हंगामाच्या शेवटी तरी दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

शेतकऱ्यांना अपेक्षा दरवाढीची

वातावरणातील बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पानदनावर झालेला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा दरही मिळालेले नाहीत. यातच पुन्हा राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मार्च आणि एप्रिलमध्ये द्राक्षाच्या मागणीत वाढ होत असते. आता जर ऊन कडक पडले तर द्राक्षांमध्ये गोडवा उतरणार आहे. त्यामुळे दर्जा आणि चीनकडील निर्यात या दोन्ही गोष्टींमध्ये सुधारणा झाली तर अपेक्षित दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

द्राक्ष आयातबाबात चीनच्या काय होत्या अटी

द्राक्ष आयात करण्यापूर्वीच चीनने काही नियम-अटी घातल्या होत्या. यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि प्रक्रिया उद्योजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यावयाची हे सांगितले होते. या सर्व बाबींचे चित्रीकरण करुन संबंधीत यंत्रणेला पाठवायचे होते. मात्र अपेडाने असे काही केले नाही. त्यामुळे द्राक्षाची निर्यात होऊ शकलेली नव्हती. पण आता निर्यात सुरु झाली आहे.

यामुळे रखडली चीनची निर्यात

चीनमध्ये द्राक्षाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यंदा मात्र, हंगाम सुरु होण्यापूर्वीच त्यांनी अपेडकडे काही नियम-अटी घातल्या होत्या. त्याची पूर्तता झाल्याशिवाय द्राक्षाची निर्यात शक्य नव्हती. मात्र, नियमांचे पालन हे शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त पदार्थ निर्यात विकास एजन्सी अर्थात अपेडा यांनी केली नाही. त्यामुळे हंगाम मध्यावर असताना एकही ट्रक चीनकडे मर्गस्थ झालेला नव्हता. आता ही समस्या दूर झाली असून सांगली जिल्ह्यातून पहिली ट्रक ही मार्गस्थ झाली आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : वातावरण निवळले आता सुगी जोमात, मजूर टंचाईवर शेतकऱ्यांचा ‘हा’ रामबाण उपाय..!

Red Chilly : पाच वर्षानंतर झोंबणार धर्माबादची लाल मिरची, हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर

राज्यात 5 हजार 142 गावांमध्ये राबवणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना; कसा होणार शिवाराचा कायापालट?

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.