Mango Export : फळांच्या ‘राजा’ ची परदेश वारी, प्रतिकूल परस्थितीमध्ये हापूसचा रुबाब कायम
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा परिणाम हा प्रत्येक गोष्टीवर झालेला आहे. याचा फटका आंबा निर्यातीवरही झाला होता. यंदा बाजारपेठा खुल्या आहेत तर निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. असे असले तरी 13 एप्रिलपासून कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत सुरु झालेली आहे.
लासलगाव : हंगामाच्या सुरवातीला यंदा (Mango Production) आंबा उत्पादन शेतकऱ्यांच्या तरी पदरी पडते की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. निसर्गाचा लहरीपणा त्यामध्येच वाढत्या उन्हामुळे झालेली (fruit Damage) फळगळ यामुळे केवळ 40 टक्के उत्पादन फळबागायत शेतकऱ्यांना मिळेल असा अंदाज होता. पण प्रतिकूल परस्थितीमध्येही फळांचा राजा असलेल्या हापूस आंबा (Mango Export) सातासमुद्रापार पोहचला आहे तो ही रुबाबात. गेल्या महिन्याभरात 180 मेट्रीक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करुन त्याची न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, शिकागो याठिकाणी आंबा निर्यात झाली आहे. त्यामुळे उत्पादन घटले असताना शेतकऱ्यांना परकीय चलन मिळाले आहे.
कोरोनामुळे निर्यातीवर परिणाम
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा परिणाम हा प्रत्येक गोष्टीवर झालेला आहे. याचा फटका आंबा निर्यातीवरही झाला होता. यंदा बाजारपेठा खुल्या आहेत तर निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. असे असले तरी 13 एप्रिलपासून कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत सुरु झालेली आहे. निर्यात प्रक्रियेला महिना पूर्ण झाला असून या कालावधीत 180 मेट्रीक टन निर्यात झाली आहे.
आंब्यावर प्रक्रिया मगच निर्यात
लासलगाव मार्गे अमेरिकेत आंब्याची निर्यात सुरु झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत,हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन 180 मॅट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना झाले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा हंगाम लांबला होता. त्यामुळे निर्यातीवरही परिणाम होणार की काय अशी स्थिती होती. मात्र, आंबा मार्केटमध्ये दाखल होताच कोरोनाच्या अनुशंगाने जे निर्बंध होते ते देखील हटविण्यात आले होते. त्यामुळे निर्यातीसाठी कोणता अडसर नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित अशी निर्यात झाली आहे.
निर्यातीमुळे उत्पादनात वाढ
आंबा पिकातून अधिकचे उत्पन्न नाही किमान झालेला खर्च तरी पदरी पडावा ही शेतकऱ्यांची माफक अपेक्षा होती. कारण हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाचा कहर आणि आता काढणी दरम्यान वाढत्या उन्हाच्या झळा याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला होता. असे असतानाही आंब्याची झालेली निर्यात शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली आहे.