Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krishi Udan Scheme : शेतकऱ्यांचा शेतीमाल सातासमुद्रापार, असा घ्या योजनेचा लाभ..!

शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन नाही तर उत्पन्नवाढीसाठीही केंद्र सरकार हे प्रयत्न करीत आहे. काळाच्या ओघात शेती उत्पादनात वाढ झाली आहे पण त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळणे तेवढेच गरजेचे आहे. कारण भारतामधील 60 टक्के जनता ही केवळ शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून हमीभाव योजना तर राबवली जात आहेच पण मागणी असलेल्या देशांमध्ये शेतीमालाचा पुरवठा करुन शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा याकरिता सन 2020 मध्ये कृषी उडान योजना सुरु करण्यात आली होती.

Krishi Udan Scheme : शेतकऱ्यांचा शेतीमाल सातासमुद्रापार, असा घ्या योजनेचा लाभ..!
कृषी उडाण योजना
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 9:31 AM

मुंबई : शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन नाही तर उत्पन्नवाढीसाठीही (Central Government) केंद्र सरकार हे प्रयत्न करीत आहे. काळाच्या ओघात (Farm Production) शेती उत्पादनात वाढ झाली आहे पण त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळणे तेवढेच गरजेचे आहे. कारण भारतामधील 60 टक्के जनता ही केवळ शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून हमीभाव योजना तर राबवली जात आहेच पण मागणी असलेल्या देशांमध्ये शेतीमालाचा पुरवठा करुन शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा याकरिता सन 2020 मध्ये (Krushi Udan Yojna) कृषी उडान योजना सुरु करण्यात आली होती. एवढेच नाही तर योजनेचे स्वरुप पाहून पुन्हा ऑक्टोंबर 2021 मध्ये 2.0 मध्ये श्रेणी सुधार करण्यात आला आहे. यामुळे नाशवंत शेतीमालाची वाहतूक ही वेळीच करणे शक्य झाले आहे. जिथे सर्व नुकसानीचे ठरत होते त्याठिकाणी आता योजनेमुळे अधिकचा फायदा होऊ लागला आहे.

विमानातील जागा शेतीमालासाठी आरक्षित

केवळ योजनांची घोषणाच नाही तर त्याची अंमलबजावणीकडेही सरकारने लक्ष दिले आहे. देशातून शेतीमालाची योग्य पध्दतीने वाहतूक व्हावी या दृष्टीने विमानातील निम्या जागा आरक्षित करुन याकरिता अनुदानही दिले जात आहे. यामध्यमातून मासे, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस यासारख्या व्यवसयासंबधीची वाहतूक करणे सोपे होणार आहे. शेतीमाल उत्पादित झाल्यानंतर तो साठवून राहिला तर अधिक प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट हे वाया जाते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि योग्य वेळी पिके बाजारात नेण्यासाठी पंतप्रधान कृषी उडान योजना उपयोगी पडत आहे.

कृषी उडान योजनेत 8 मंत्रालयांचा हातभार

कुण्या एका शेतीमालासाठी नाही तर वेगवेगळा शेतीमाल परदेशातील बाजारपेठेत उपलब्ध करुन शेतकऱ्यांना अधिकचा फायदा मिळवून देण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे कृषी उडान योजनेमध्ये नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण विभाग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, वाणिज्य विभाग, आदिवासी व्यवहार मंत्रालय, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय यांचा समावेश आहे. वर्षागणीस विमानतळांचा सहभाग वाढवला जात आहे. औरंगाबादची यामध्ये नुकतीच भर पडली आहे. देशभरातील 53 विमानतळे ही या योजनेसाठी जोडण्यात आली आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचाही समावेश असल्याचे हवाई वाहतूक राज्यमंत्री व्ही.के सिंह यांनी सांगितले आहे. शेतकरी शेतीमालाची आयात-निर्यातीमधून अधिकचा नफा कमावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता अन् आवश्यक कागदपत्रे

1) प्रधानमंत्री कृषी उडान योजनेचा लाभ झाल्यास अर्जदाराला भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)अर्जदार शेतकरी असावा, तरच त्याला हा फायदा होईल. 3) अर्जासाठी आवश्यक आधार कार्ड 4) अर्जदाराला शेतीशी संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतील 5) अर्जदाराने निवास प्रमाणपत्र दाखवायलाच हवे. 6) दोन उत्पन्न प्रमाणपत्रातही अर्जदार दाखवू शकतो. 7) रेशन कार्ड. 8) मोबाइल क्रमांक आदी बाबींची आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यात उभा राहतोय रेशीम शेतीचा पर्याय, लागवड ते काढणी असे करा नियोजन..!

Rabi Season: ज्वारी बाजारात, पहिला मान सोलापूर बाजार समितीला, हंगामाच्या सुरवातीला मुख्य पिकाचे चित्र काय?

Drone Farming: ‘ड्रोन’ खरेदीबाबत महत्वाचा निर्णय, नियमांचे पालन करा अन्यथा कृषी संस्थांनाचा भुर्दंड

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.