Bogus Fertilizer : अमरावतीमध्ये बनावट खताचा साठा, खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर नवे संकट
अमरावती जिल्ह्यामध्ये काही दिवसपूर्वी चांदुर बाजार येथे मातीमिश्रित खते विकणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. सोमवारी रात्री भातकुली येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने बनावट खते विकणाऱ्या मिलिंद वानखडे यांच्यावर धाड टाकून 63 बॅग खते जप्त केली आहे. दरम्यान वलगाव पोलिसात याबाबत गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. सध्या पावसाने हजेरी लावली असून खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असून याचाच फायदा खत विक्रेते घेत आहेत.
अमरावती : (Kharif Season) खरीप हंगामासाठी मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा झाला असताना आता जिल्ह्याच्या ठिकाणी (Fake Fertilizer) बनावट खत निर्माण करुन शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. पावसाच्या हजेरीने पेरणीची लगबग सुरु असतानाच हा प्रकार राज्यात समोर येत. अमरावतीमध्ये तर याचे प्रमाण अधिकचे असून हंगाम सुरु झाल्यापासून दोन वेळेस बनावट खत ही जप्त करण्यात आले आहे. (Agricultural Department) कृषी विभागाने भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथून डीएपी खताची 63 पोती ही जप्त केली आहेत. डीएपीच्या नावाखाली इतर बनावट खताची निर्मिती करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती. मात्र, कृषी विभागाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. यामध्ये 88 हजार रुपयांचे बनावट खत ताब्यात घेण्यात आले आहे.
बनावट खत निर्मितीप्रकरणी गुन्हा दाखल
अमरावती जिल्ह्यामध्ये काही दिवसपूर्वी चांदुर बाजार येथे मातीमिश्रित खते विकणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. सोमवारी रात्री भातकुली येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने बनावट खते विकणाऱ्या मिलिंद वानखडे यांच्यावर धाड टाकून 63 बॅग खते जप्त केली आहे. दरम्यान वलगाव पोलिसात याबाबत गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. सध्या पावसाने हजेरी लावली असून खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असून याचाच फायदा खत विक्रेते घेत आहेत. अधिकच्या दराने बोगस खत विक्री केली जात आहेत.
कृषी विभागाचे काय आवाहन?
बनावट खत निर्मितीमधून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. बनावट खते शेतकऱ्यांनपर्यंत जाऊ नयेत याकरिता कृषी विभागाने बनावट पद्धतीच्या किंवा कमी किमतीचे खते विक्री निदर्शनात आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील केले आहे. मात्र, हंगाम सुरु झाल्यापासून अमरावतीमध्ये अशाप्रकारे दुसरी कारवाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही तेवढेच सतर्क राहणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
कृषी विभाागाची परवानगी नसताना शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी केल्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान झाले तरी मदत मिळेलच असे नाही. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे.