Onion Rate: कांदा दारचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर, 3 एकरावरील उभ्या पिकावर फिरवला नांगर
ऊसानंतर सर्वात मोठे नगदी पीक हे कांदा आहे. यामधून मोठे उत्पन्न मिळत असले तरी हे पीक बेभरवश्याचे आहे. शेतकरी प्रयत्नांची पराकष्टा करुन कांदा जोपासतो मात्र, रात्रीतूनच कांदा दरात असा काय फरक होतो की शेतकऱ्यांचे परिश्रम आणि सर्वकाही मातीमोल ठरते. खरीप हंगामातील कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. हंगामाच्या सुरवातीला आणि साठवणूकीतला कांदा संपताना कांद्याला विक्रमी दर मिळाला होता. दीड महिन्यापूर्वी 3 हजार 300 रुपये क्विंटल असलेला दर आता थेट 900 रुपयांवर येऊन ठेपला आहे.
लासलगाव : ऊसानंतर सर्वात मोठे (Cash Crop) नगदी पीक हे कांदा आहे. यामधून मोठे उत्पन्न मिळत असले तरी हे पीक बेभरवश्याचे आहे. शेतकरी प्रयत्नांची पराकष्टा करुन कांदा जोपासतो मात्र, रात्रीतूनच (Onion Rate) कांदा दरात असा काय फरक होतो की शेतकऱ्यांचे परिश्रम आणि सर्वकाही मातीमोल ठरते. खरीप हंगामातील कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी (Summer Season) उन्हाळी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. हंगामाच्या सुरवातीला आणि साठवणूकीतला कांदा संपताना कांद्याला विक्रमी दर मिळाला होता. दीड महिन्यापूर्वी 3 हजार 300 रुपये क्विंटल असलेला दर आता थेट 900 रुपयांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केली त्यांचे साधले पण आता मातीमोल होत आहे. उत्पादनावरील खर्च सोडा वाहतूक करुन कांदा बाजारपेठेत घेऊन जाणेही परवडत नसल्याने येवला तालुक्यातील ठाणगाव येथील शेतकरी रामदास गरूडे यांनी आपल्या उभ्या साडेतीन एकर पिकावर नांगर फिरवला आहे. निसर्गाचा लहरीपणा कांद्याच्या दराचा भरवसा कोणी देऊ शकत नाही.
म्हणून शेतकऱ्याने फिरवला उभ्या पिकावर नांगर
कांदा दरातील चढ-उताराचा फटका अधिकतर शेतकऱ्यांनाच बसत आहे. कांद्याचे दिवसागणीस घसरणारे दर आणि दुसरीकडे मजुरीमध्ये होत असलेली वाढ याचा ताळमेळ शेतकरी रामदास गरुडे यांना लागलाच नाही. चार महिने उत्पादनावर झालेला खर्च आणि आता काढणीच्या दरम्यानचे दर याचा कुठेच मेळ लागत नाही. आतापर्यंत तर खर्च झालाच आहे पण कांदा विक्रीस नेला तरी वाहतूकीचा खर्चही पदरुन करावा लागणार होता. त्यामुळे तीन एकरातील कांद्यावर नांगर फिरवला असून आता इतर पिकाचे उत्पादन घेण्यासाठी क्षेत्र रिकामे केल्याचे गरुडे यांनी सांगितले.
उन्हाळी कांदा क्षेत्रामध्ये विक्रमी वाढ
यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी पूर्णपणे पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. पारंपरिक पिकांची जागा ही कडधान्यांनी घेतली होती तर उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रातही वाढ झाली होती. उन्हाळी कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली होती. शिवाय उन्हाळी कांदा काढणीपर्यंत कांद्याचे दर हे टिकून होते. पण मुळात मागणीच घटल्याने कांदा दरात कमी आली आहे. गेल्या महिन्याभरात हे दर अधिकच गतीने घसरले आहेत. सध्या कांद्याच्या प्रतवारीनुसार 800 रुपयांपासून ते 1 हजार 300 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
सध्या कांद्याच्या दराचे काय आहे चित्र?
सध्या उन्हाळी हंगामातील कांद्याची छाटणी सुरुच आहे. मात्र, घटत्या दरामुळे अनेक शेतकरी हे साठवणूकीवर भर देत आहेत. पण ही सुविधा प्रत्येक शेतकऱ्यांकडेच आहे असे नाही. दीड महिन्यापूर्वी कांद्याची वर्गवारी न करता सरसकट 3 हजार 300 रुपये क्विंटल असा दर होता. मात्र, गेल्या 45 दिवसांमध्ये 3 हजार 300 रुपये क्विंटल असलेला कांदा थेट 800 रुपयांवर आला आहे. शिवाय चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1 हजार ते 1 हजार 200 असा दर मिळत आहे. ठोक बाजारात ही अवस्था असली तरी किरकोळ बाजारात अधिकचे दर आहेत.
संबंधित बातम्या :
‘पीएम किसान’ योजनेतील हे बदल माहिती आहेत का?… जाणून घ्या आवश्यक बाबी…
Fertilizer : खरिपाच्या तोंडावर खतांच्या किंमतीमध्ये वाढ, केंद्र सरकारचे धोरण काय?