Lasalgoan : कांद्याचा वांदाच, चारा पीक असलेल्या मकाचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा..!
यंदा युद्धाच्या परिणामामुळे मक्याचा तुटवडा देशासह विदेशात मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नेपाळ, व्हिएतनाम, मलेशिया, कोलंबो यासह इतर देशात पोल्ट्री व स्टार्च उद्योगात मक्याची मागणी वाढल्याने मक्याच्या या हंगामात लासलगांव बाजार समितीत 2491 रुपये इतका उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीच्या इतिहासात या बाजार भावाची ऐतिहासिक नोंद झाली आहे.
लासलगाव : कोणत्या शेतीमालाचे दर कधी वाढतील हे सांगता येणं कठीण झाले आहे. नगदी पीक म्हणून ओळखला जाणारा (Onion) कांदा आता 1 रुपया किलोने विकला जात आहे तर जनावरांना चारा होईल या उद्देशाने लागवड केलेल्या (Maize Rate) मक्याचे दर गगणाला भिडले आहेत. शेतकऱ्यांनी काहीही पिकवले तरी तेवढीच महत्वाची ही बाजारपेठ आहे. विशेष म्हणजे लासलगाव बाजार समितीच्या स्थापनेपासून जे घडले नाही ते यंदा (Fodder Crop) मका पिकाबाबत झाले आहे. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच मकाला 2 हजार 491 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. हे सर्व रशिया-युक्रेनच्या युध्दजन्य परस्थितीमुळे झाल्याचे बाजार समितीचे सचिव यांनी सांगितले आहे. या युध्दजन्य परस्थितीमुळे देशासह विदेशात मक्याची मागणी वाढली आहे.
प्रति क्विंटलमागे 1 हजाराने दरात वाढ
मका तसे उत्पादनासाठी आणि जनावरांना हिरावा चारा यासाठीही लागवड केली जाणारे पीक आहे. धान्यातील पिवळे सोने म्हणून मक्याची ओळख आहे. मात्र, यंदा खरोखरच सोन्याप्रमाणे मक्याला भाव मिळू लागला आहे. गतवर्षी 1 हजार 572 रुपये किलोने मकाची विक्री होत होती. यंदा मागणी वाढल्याने हेच दर आता 2 हजार 491 रुपयांवर येऊन पोहचले आहेत. केवळ देशांतर्गतच नाही तर परदेशातही मक्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे निर्यातही वाढली आहे. या सर्व परस्थितीचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना होत आहे.
या देशात होतेय निर्यात
यंदा युद्धाच्या परिणामामुळे मक्याचा तुटवडा देशासह विदेशात मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नेपाळ, व्हिएतनाम, मलेशिया, कोलंबो यासह इतर देशात पोल्ट्री व स्टार्च उद्योगात मक्याची मागणी वाढल्याने मक्याच्या या हंगामात लासलगांव बाजार समितीत 2491 रुपये इतका उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीच्या इतिहासात या बाजार भावाची ऐतिहासिक नोंद झाली आहे. तसेच विदेशात मुंबई, चेन्नई, विशाखापटनम आणि कृष्णापटनम या बंदरावर यावर्षी 12 ते 16 लाख मेट्रिक टन मक्याची देशातून निर्यात झाल्याने यातून देशाला कोट्यावधीचे परकीय चलन मिळाले असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे.
मुख्य पिकातून नुकसान चारा पिकाचा आधार
नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वर्षभरातील तीन हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यामधून किमान एकवेळ तरी चांगला दर मिळतो हे ठरलेले गणित आहे.पण यंदा कांद्याची मागणीच घटल्याने सलग दोन महिन्यापासून दरात घसरण सुरु आहे. तर दुसरीकडे जनावरांना चारा पिक म्हणून लागवड केलेल्या मकाला सर्वाधिक दर मिळत आहे. यंदाचे दर हे विक्रमी असून शेतकऱ्यांना याचा दुहेरी फायदा होत असल्याचे बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले आहे.