Soybean Rate : आता उलटी गिनती सुरु..! आठ दिवसांमध्ये घडले अन् एका रात्रीतून बिघडले

दराच्या चढ-उताराबाबत कांदा हेच लहरी पीक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे. एका रात्रीतून कांद्याचे दर वाढतात किंवा कवडीमोल होतात. त्यावरुनच त्याची विक्री करण्याची सुत्रे ठरतात. पण हेच सोयाबीनबाबत झाले तर. अहो झाले तर काय झालेच आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात जी सुधारणा झाली होती ती संपूर्ण हंगामात पाहायली मिळाली नाही. पण दर वाढण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी गेला आणि दर घसरण्यासाठी एक रात्र जावी लागली.

Soybean Rate : आता उलटी गिनती सुरु..! आठ दिवसांमध्ये घडले अन् एका रात्रीतून बिघडले
सोयाबीनचे दर स्थिर असले तरी आवक मात्र सुरुच आहे.
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 2:09 PM

लातूर : दराच्या चढ-उताराबाबत कांदा हेच लहरी पीक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे. एका रात्रीतून (Onion Rate) कांद्याचे दर वाढतात किंवा कवडीमोल होतात. त्यावरुनच त्याची विक्री करण्याची सुत्रे ठरतात. पण हेच (Soybean Rate) सोयाबीनबाबत झाले तर. अहो झाले तर काय झालेच आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात जी सुधारणा झाली होती ती संपूर्ण हंगामात पाहायली मिळाली नाही. पण दर वाढण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी गेला आणि दर घसरण्यासाठी एक रात्र जावी लागली. 7 हजार 300 रुपयांवर गेलेले सोयाबीन आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 6 हजार 900 वरच येऊन ठेपले आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी जे अपेक्षित होते ते सर्वकाही रात्रीतून कवडीमोल झाले आहे. आता पुन्हा शेतकऱ्यांकडेपुढे एकच प्रश्न आहे. तो म्हणजे सोयाबीनची विक्री की साठवणूक?

आठ दिवासांमध्ये कसे झाले दरात बदल?

15 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन हे 6 हजार 300 वर स्थिर होते. तर लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 10 ते 12 पोत्यांची आवक सुरु होती. शेतकऱ्यांना अपेक्षित नाही पण सरासरीप्रमाणे दर मिळत असल्याने आवकमध्ये वाढ होत होती. 17 फेब्रुवारीपासून दिवसाला 50 ते 100 रुपायंनी दर वाढण्यास सुरवात झाली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये 6 हजार 700 वर असलेले सोयाबीन गुरुवारी 7 हजार 350 वर पोहचले होते. आता दरात कायम वाढ होत राहणार असाच सर्वांचा समज झाला होता. त्यामुळे व्यापारी देखील शेतकऱ्यांना साठवणूकीचा सल्ला देत होते. पण शुक्रावारी दर स्थिर राहिले आणि शनिवारी तर यामध्ये 400 रुपायांची घट झाली आहे.

मोजक्याच शेतकऱ्यांची चांदी

गेल्या आठ दिवासांपासून ज्या प्रमाणात सोयाबीनचे दर वाढत होते त्यानुसार ही वाढ अणखीन आठ दिवस राहणार असल्याचे सांगितले जात होते. शिवाय दर घटले तरी 50 100 रुपये प्रतिक्विंटल मागे कमी होतील असे गणित शेतकऱ्यांचे होते. पण एका रात्रीतून 400 रुपायांची घसरण झाली आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या तीन दिवसांमध्ये ज्यांनी सोयाबीनची विक्री केली त्यांनाच अधिकचा फायदा झाला आहे.

आता पुढे काय?

सोयाबीनच्या दरात एवढ्या कमी वेळेत एवढे मोठे बदल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री करणे गरजेचे आहे. फायदा आणि नुकसान कमी प्रमाणात झाले तरी चालेल पण टप्प्याटप्प्याने विक्री हेच महत्वाचे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

E-Pik Pahani : कृषी विभाग बांधावर, जे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का?

कांद्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये कोण खातयं ‘भाव’? नव्याने आवक अन् विक्रमी दरही

तूर खरेदी केंद्र : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खरेदी केंद्रावर विक्री सोडा नोंदणीही नाही, नेमके कारण काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.