केळीच्या दरात घसरण, आता लागवडीपासूनचे नियोजन गरजेचे, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला ?
केळी हे असे फळ आहे जे तीन्ही हंगामात घेतले जाते. बारामाही केळीला मागणी असते मात्र, यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम यंदा केळी बागावर पर्यायाने केळीच्या दरावरही झाला आहे. दरवर्षी सरासरी एवढा दर मिळत असल्याने खानदेशात केळीचे क्षेत्र हे वाढत असते. पण काळाच्या ओघात आता सर्वत्रच केळीची लागवड केली जाते.
जळगाव : केळी हे असे फळ आहे जे तीन्ही हंगामात घेतले जाते. बारामाही (Banana) केळीला मागणी असते मात्र, यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम यंदा केळी बागावर पर्यायाने केळीच्या दरावरही झाला आहे. दरवर्षी सरासरी एवढा दर मिळत असल्याने खानदेशात केळीचे क्षेत्र हे वाढत असते. पण काळाच्या ओघात आता सर्वत्रच (Banana cultivation) केळीची लागवड केली जाते. 7 ते 8 रुपये हा सरासरीचा दर आहे पण यंदा शेतकऱ्यांना 3 ते 4 रुपये किलोनेच विक्री करावी लागली होती. शिवाय रोगराईमुळे अनेकांनी बागांची मोडणी करुन इतर पीक घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी केळीची लागवड करताना योग्य असे नियोजन करणेच गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने म्हणजेच आता फेब्रुवारी-मार्च मध्ये लागवड केली तर अधिकचा फायदा होणार असल्याचे मत (Agronomist) कृषितज्ञ के.बी.पाटील यांनी व्यक्त केले आहे. केळीची लागवड तीन्हीही हंगामात केली जात असली तरी शेतकरी एकाच हंगामावर भर देतात. त्यामुळे बाजारात एकाच वेळी आवक वाढते परिणामी त्याचा दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे आता बाजारपेठेचा आणि योग्य वातावरणाचा अभ्यास करुनच केलेली लागवड फायद्याची राहणार आहे.
शेतकऱ्यांचे गणित नेमके चुकते कुठे?
शेतकरी केळी लागवडीचा निर्णय हा सध्याच्या दरावरुन ठरवतात. मात्र, सध्याचे दर आणि पुढील वर्षी कापणीच्या प्रसंगी तेच राहतील असे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजचे नियोजन हे पुढील वर्षी देखील फायद्याचे राहणार या दृष्टीकोनातून विचार करणे गरजेचे आहे. मात्र, खानदेशात आणि राज्यात सर्वत्रच शेतकरी हे एकाच वेळी केळीची लागवड करतात. त्यामुळे आजची दराची ही अवस्था झाली आहे. शिवाय वातावरणातील बदलाचा परिणाम थेट केळीच्या बागावर झालेला आहे. खानदेशासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी केळीच्या बागा तोडल्या आहेत. ही वेळ येऊ नये म्हणून लागवड दरम्यानचे नियोजन गरजेचे असल्याचे जागतिक केळी तज्ञ के.बी.पाटील यांनी सांगितले आहे.
यामुळे फेब्रुवारी-मार्च मधील लागवड राहणार फायद्याची
फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या दरम्यान आंध्रप्रदेशातील अनंतपूर कडप्पा आणि कर्नुल जिल्हे तसेच महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड केली जाते. पण यंदा अतिपाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे केळी या बागेतच पिकल्या. त्यामुळे आता दर हे कमी झाले आहेत. त्यामुळे या दरम्यान, केळीची लागवड केली तर पुढे फायदा राहणार आहे.
संबंधित बातम्या :
Silk Farming: म्हणून पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा, रेशीम कोषचे दर अवाक् करणारे..!
नैसर्गिक शेतीसाठी आंध्र प्रदेशचे पहिले पाऊल, महाराष्ट्र सरकार केव्हा घेणार निर्णय ?
APMC: मुंबई बाजार समितीचा मोठा निर्णय, अनाधिकृत व्यापार करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा