Watermelon : दुष्काळात तेरावा, वावरात कलिंगडचे नुकसान अन् बाजारपेठेत कवडीमोल दर

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील बेलोरा येथील प्रफुल्ल जाणे यांनी अडीच एकरामध्ये कलिंगडची लागवड केली होती. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मार्केट मिळाले नाही तर आता किलंगड ऐन बहरात असतानाच रानडुकरांनी ते उध्वस्त केले आहे. यामध्ये लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी जाणे यांनी सांगितले आहे.

Watermelon : दुष्काळात तेरावा, वावरात कलिंगडचे नुकसान अन् बाजारपेठेत कवडीमोल दर
वन्यप्राण्यांनी वर्धा जिल्ह्यातील कलिंगड पिकाचे नासधूस केला आहे. नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 2:46 PM

वर्धा : संकटे आली तर ती चोहीबाजूनेच येतात. गेल्या काही दिवसांपासून (Watermelon Rate) कलिंगडच्या दरात घसरण सुरु आहे. अवघ्या महिन्याभरातच (Watermelon) कलिंगडचे दर हे निम्म्यावर आले आहेत. हे कमी म्हणून की काय जिल्ह्यातील बेलोरा गावच्या शिवारात रानडुक्करांनी कलिंगड उध्वस्त केले आहेत. एकाच रात्रीतून तब्बल अडीच एकरातील (Watermelon Damage) कलिंगड उध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. दरवर्षी उन्हाळी हंगामातील पिकांना रानडुक्करांच्या उपद्रवचा त्रास हा ठरलेलाच आहे. असे असतानाही वनविभागाकडून कोणतिही उपाययोजना केली जात नाही हे विशेष.

अडीच एकरातील कलिंगडचे नुकसान

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील बेलोरा येथील प्रफुल्ल जाणे यांनी अडीच एकरामध्ये कलिंगडची लागवड केली होती. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मार्केट मिळाले नाही तर आता किलंगड ऐन बहरात असतानाच रानडुकरांनी ते उध्वस्त केले आहे. यामध्ये लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी जाणे यांनी सांगितले आहे. या भागात रानडुक्करांचा हैदोस वाढत असून शेतकरी त्रस्त आहेत. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

तोडणीच्या दरम्यानच कलिंगड उध्वस्त

जाणे यांनी तब्बल अडीच एकरावर कलिंगडची लागवड केली होती. त्यामुळे गतवर्षी झालेले नुकसान यंदा भरुन निघेल असा विश्वास जाणे यांना होता. शिवाय योग्य प्रकारे जोपासणा केल्याने पीकही बहरात होते. आता 10 दिवसांवर तोडणी आली होती. असे असले तरी दुसरीकडे कलिंगडच्या दरातही घट झाल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होणार होता. पण हे सर्व घडण्यापूर्वीच वावरातले कलिंगड बाहेर येण्यापूर्वीच उध्वस्त झाले होते.

हे सुद्धा वाचा

दरात निम्म्याने घट

हंगामाच्या सुरवातीला 15 ते 16 रुपये किलो असे कलिंगडचे दर होते. मागणीच्या तुलनेत पुरवठा नव्हता शिवाय बाजारपेठा पूर्ण क्षमतेने खुल्या झाल्याने मागणीही वाढली होती. हंगामाच्या सुरवातीला बाजारपेठेतले चित्र हे वेगळेच होते. शिवाय रमजान महिन्यात दर आणखीन वाढतील अशी आशा उत्पादकांना होती पण अचानक आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. 8 ते 10 रुपये किलोने कलिंगडची विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे घसरते दर आणि त्यात पुन्हा वन्यप्राण्यांकडून झालेले नुकसान हे शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.