Success Story : बाजारात विकेल तेच शेतामध्ये पिकेल, पांरपरिक पिकांना फाटा देत युवा शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग

काळाच्या ओघात शेती व्यवसायामध्ये बदल केला तरच उत्पन्न पदरी पडणार आहे. शेती आहे म्हणून करण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. बदललेल्या परस्थितीचे भान ठेऊन जिल्ह्यातील उच्च शिक्षित तरुणाने असा काय उपक्रम केला आहे ज्याची कल्पना शेतकऱ्यांनीच का कृषी अधिकाऱ्यांनीही केली नसेल. कारंजी गावच्या अमोल बयस याने शेती करायची म्हणून नव्हे तर यातून अधिकचे उत्पन्न मिळवायचे म्हणून अश्वगंधा या आयुर्वेदिक वनस्पती शेतीचा प्रयोग केला आहे.

Success Story : बाजारात विकेल तेच शेतामध्ये पिकेल, पांरपरिक पिकांना फाटा देत युवा शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याने अश्वगंध वनस्पती शेतीचा प्रयोग केला आहे. एकरी लाखोंचे उत्पन्न अपेक्षित आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 1:08 PM

वाशिम : काळाच्या ओघात (Farming) शेती व्यवसायामध्ये बदल केला तरच उत्पन्न पदरी पडणार आहे. शेती आहे म्हणून करण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. बदललेल्या परस्थितीचे भान ठेऊन जिल्ह्यातील उच्च शिक्षित तरुणाने असा काय उपक्रम केला आहे ज्याची कल्पना शेतकऱ्यांनीच का कृषी अधिकाऱ्यांनीही केली नसेल. कारंजी गावच्या अमोल बयस याने शेती करायची म्हणून नव्हे तर यातून (More income) अधिकचे उत्पन्न मिळवायचे म्हणून (Ashwagandha Farming) अश्वगंधा या आयुर्वेदिक वनस्पती शेतीचा प्रयोग केला आहे. यासंबंधीची सर्व माहिती घेऊन कमी उत्पादन खर्चात कुठल्याही रासायनिक कीटकनाशकांच्या वापरा विना समाधानकारक नफा या प्रयोगशील शेतकऱ्यास मिळणार आहे.शिक्षण पूर्ण केल्यावर केवळ नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसाय पण त्याला आधुनिकतेची जोड देत करण्याचा निर्धार अमोल याने केला होता. तो आज पूर्णत्वाला आल्याचे चित्र आहे.

अश्वगंधा चार महिन्यात उत्पन्न देणारे भरवश्याचे पीक

अश्वगंधा शेती आजही एक नवा प्रयोग आहे. पण अचूक माहिती आणि पीक पध्दतीमध्ये बदल करण्याचे धाडस असल्यावर काय होते हे कारंजीच्या अमोल बयस या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. अमोल बयस यांनी इंदूर येथून अश्वगंधाचे बियाणे मिळवून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची लागवड आपल्या शेतात केली असून बियाण्यासह पेरणी निंदन मशागतीचा 30 हजार रुपये खर्च त्यांना आला आहे. या वनस्पतीस परिपक्व होण्यासाठी साडेचार महिन्याचा कालावधी लागणार आहे. या वनस्पतीच्या मुळ, बिया,पाने व खोड सुद्धा औषधी निर्मितीसाठी उपयोगात येणार असल्याने यातून एकरी एक लाख रुपयांचे अपेक्षित आहे.

पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय

आतापर्यंत वाशिम जिल्ह्यातील कारंजी शिवारात पारंपरिक पिकांवरच शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. पीक पध्दतीमध्ये बदल केल्यास आहे ते उत्पन्नही मिळायचे नाही असा शेतकऱ्यांचा समज आहे. पण लागवडीपासून बाजारपेठेपर्यंतचा अभ्यास करुन उत्पादन घेतले तर यशस्वी होता येते हे अमोल बयस याने दाखवून दिले आहे. पंचक्रोशीत कोणीच अश्वगंध शेतीचा प्रयोग केला नव्हता तो अमोलने केला आहे. शिवाय यामध्ये रासायनिक खताचा वापर न करता त्याने ही किमया साधलेली आहे. चार महिन्याच्या या पिकात एकरी लाखोंचे उत्पन्न मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अश्वगंधा शेतीला वेगळे महत्व

आयुर्वेदात महत्वाच्या स्थानी असणाऱ्या अश्वगंधा या औषधी वनस्पतीस प्रचंड मागणी असून या वनस्पतीचे मुळ, खोड व पाला याचा वापर औषधी निर्मितीत होतो. ही बाब लक्षात घेऊन अमोल बयस यांनी आपल्या एक एकर शेतीत अश्वगंधा ची लागवड केली आहे.

संबंधित बातम्या:

Hapus Mango : फळांचा राजा ‘ऑनलाईन’द्वारेही मिळणार, रत्नागिरीत अनोख्या उपक्रमाला दणक्यात सुरवात

Milk : दर वाढले अन् उत्पादन घटले, वाढत्या उन्हात दूध उत्पादनवाढीसाठी काय काळजी घ्यावी ?

Nanded : उन्हामुळे गावरान काकडीला विक्रमी दर, शेतकऱ्यांनीच घेतलं Market ताब्यात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.