बळीराजाचे पैसे परस्पर लाटले, कर्ज फेडण्यासाठी तगादा; शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा
नाझरकर यांनी ही रक्कम शैलेश पाटील यांच्या कर्जाच्या खात्यात भरलीच नाही. | Farmer suicide
सोलापूर: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला बँक अधिकाऱ्यांकडून नाडले जात असल्याचा प्रकार नुकताच सोलापुरात समोर आला होता. बँक अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून मंगळवेढ्यातील शैलेश बसवेश्वर पाटील या शेतकऱ्याने 15 मार्चला आत्महत्या (Farmer Suicide) केली होती. त्यानंतर आता या शेतकऱ्याच्या पाठी कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या निवृत्त बँक सरव्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Farmer suicide in Solapur Maharashtra)
विशेष गोष्ट म्हणजे शैलेश पाटील यांनी कर्जाची रक्कम चुकतीही केली होती. मात्र, तरीही रतनचंद शहा बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर आणि वसुली अधिकारी बसवेश्वर सलगरकर यांच्याकडून शैलेश पाटील यांनी शेतकऱ्याच्या पाठी कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला होता. या दोघांवरही मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
शैलेश पाटील यांनी रतनचंद शहा बँकेकडून शेतीसाठी 3 लाखांचे कर्ज घेतले होते. शैलेश पाटील हे कर्ज हप्त्याने फेडत होते. त्यासाठी शैलेश पाटील बँकेचे तत्कालीन प्रभारी सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांना सातत्याने पैसे देत होते. मात्र, नाझरकर यांनी ही रक्कम शैलेश पाटील यांच्या कर्जाच्या खात्यात भरलीच नाही. उलट शैलेश पाटील यांच्यापाठी कर्जवसुलीसाठी आणखी तगादा लावला. या त्रासाला कंटाळून शैलेश पाटील यांनी 15 मार्चला विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती.
अरविंद नाझरकर यांच्या काळात गैरव्यवहार
रतनचंद शहा बँकेच्या टेंभुर्णी शाखेत साडेपाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे जानेवारी महिन्यात समोर आले होते. यावेळी अरविंद नाझरकर यांनी बँकेचे शाखाधिकारी आणि कॅशिअर यांच्याविरोधात पोलिसांत फिर्याद दिली होती.
2016 ते 2016 या काळात टेंभुर्णी शाखेतून या अधिकाऱ्यांनी जवळपास पाच कोटी रुपये हडप केले होते. त्यामुळे सोलापुरात बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
संबंधित बातम्या:
संसार घराबाहेर फेकला, शिवीगाळ करत मारहाण, सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
जालन्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
(Farmer suicide in Solapur Maharashtra)