बळीराजाचं मरण कधी थांबणार? विदर्भातला आत्महत्येचा आकडा पुन्हा वाढला

जगाचा पोशिंदा, आपला अन्नदाता बळीराजा आत्महत्येला (Farmer Suicide) कवटाळतो आहे. निसर्गाचा लहरीपणा योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतीतून मिळणारा नफा शेतकऱ्याला मिळत नाहीये. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून शेतकरी आपलं जीवन संपवतो आहे.

बळीराजाचं मरण कधी थांबणार? विदर्भातला आत्महत्येचा आकडा पुन्हा वाढला
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 4:32 PM

अमरावती : जगाचा पोशिंदा, आपला अन्नदाता बळीराजा आत्महत्येला (Farmer Suicide) कवटाळतो आहे. निसर्गाचा लहरीपणा योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतीतून मिळणारा नफा शेतकऱ्याला मिळत नाहीये. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून शेतकरी आपलं जीवन संपवतो आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. सरकारचं वेळकाढू धोरण आणि केवळ आश्वासन यात शेतकरी डबघाईस आलेला आहे. निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला आहे. दुसरीकडे हमीभावालाही (Guarantee rate) मारामार. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत नसल्याने शेतकऱ्याच्या गळ्याचा फास आवळत आहे. नैसर्गिक संकटातून नुकसान होऊ नये, याकरिता शेतकरी विमा (Crop insurance) काढतो.. मात्र त्याला विमा मिळवायसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. आजच्या घडीला एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशीच बळीराजाची अवस्था झाली आहे.

विदर्भात सर्वाच जास्त आत्महत्या

पीकविम्याबाबत कृषी विभागान धोरण जाहीर केलं आहे, सरकारने नियुक्त केलेल्या कंपन्यांकडे नुकसान भरपाई देण्याचं काम आहे. यासाठी कृषी विभागाकडून योग्य ते मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं जातं असे कृषी विभागाकडून सांगण्यात येतंय. मात्र वास्तव वेगळं आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याने भाजप नेत्यांनी राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उडवली आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्या वाढत असताना सरकारचं याकडे लक्ष नसल्याचा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. कृषी तज्ञांच्या मते शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे. तरच शेतकरी आधुनिकतेकडे वळेल असे अनेकांचे मत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यामधून 14 जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रवर्ग करण्यात आलेत.

आत्महत्यांची सध्याची आकडेवारी

पश्चिम विदर्भ

अमरावतीत 356 यवतमाळ 299 बुलढाणा 285 अकोला 138 वाशीम 75

मराठावाडा विभाग

बीड 210 औरंगाबाद 172 उस्मानाबाद 126 परभणी:- 83 जालना:- 79 लातूर :- 64 हिंगोली :- 36

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हजारो आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक पाऊलं उचलण्यात आली. मात्र तरीही वास्तव विदारक आहे. जगाला जगवणार बळीराजाच मृत्युच्या दाढेत आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी ठोस निर्णयांची आणि शेतमालाला योग्य भाव मिळण्याची गरज आहे. तेव्हाच ही आकडेवारी बदलेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं, त्याच कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची ही अवस्था प्रत्येकाला अस्वस्थ करणारी आहे.

Rabbi Season : रब्बी हंगामातही तेलबियांचे क्षेत्र वाढले, मुख्य पिकांना शेतकऱ्यांनी डावलले

KL Rahul: घरात शुभकार्य असल्यामुळे केएल राहुल वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये खेळत नाहीय?

Nagpur | ताडोबा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार; विजय वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.