अहमदनगर : मध्यंतरी (Agricultural Pump) कृषीपंपाला 10 तास आणि तो ही दिवसा विद्युत पुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात बेमुदत धरणे आंदोलन केले होते. त्यानुसार 10 तास कृषीपंपासाठी वीज पुरवठा देण्याचा निर्णय झाला आहे. असे असताना आता अहमदनगर जिल्ह्यात कृषी पंपाची वीज तोडणी मोहीमच बंद करण्यासाठी रास्तारोको करण्यात आला होता. (Rayat Sanghatna) रयत संघटनेच्यावतीने हा रास्तारोको करण्यात आला होता. सध्या (Rabi Season) रब्बी हंगामातील पिके बहरात असून उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही मोहीमच बंद करण्यासाठी हा रास्तारोको करण्यात आला होता. श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड रोडवर मढेवडगाव येथे दोन तास रास्तारोको केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक होत आहेत.
आंदोलनाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी हे आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक शेतकऱ्यांनी महावितरणच्या आश्वासनाशिवाय रास्ता रोको बंद करणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे तब्बल दोन तास नगर दौंड रोडवरील वाहतूक खोळंबली होती. रब्बीचे पीक आणि फळबागा काढणीला येत असताना कृषी पंपाची वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वीज तोडणी तात्काळ बंद करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे.
कृषि पंपाची वीज तोडणी मोहीम बंद करावी व वीज बिल माफ करावे आणि शेतकऱ्यांना 8 तास दिवसा विज देण्यात यावी.दोन टप्प्यात एफआरपीचा शासन निर्णय मागे घेऊन उस उत्पादकांना एक रकमी एफआरपी मिळावी. राज्य शासनाच्या कर्ज माफीपासुन वंचित राहिलेले शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत थकीत कर्जमाफी मिळावी.या मागण्या करण्यात आल्या.
रयत क्रांती संघटनेच्यावतीने श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव याठिकाणी दौंड रोडवर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल.या आंदोलनासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांसह श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांचा ऊस शेतात आहे, कालावधी उलटूनही त्याचे गाळप झालेले नाही. त्यामुळे शेककऱ्यांनी वीज बिल कुठून भरणार? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
Photo Gallery : नुकसानीची अवकाळी, काढणीला आलेली पीके भुईसपाट, रात्रीतूनच झालं होत्याचं नव्हतं..!
अवकाळाचे थैमान सुरुच राहणार, आता विदर्भ-मराठवाड्याला धोका, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
Agricultural Pump : वाढीव वीजबिलावर रामबाण उपाय, पडताळणी अन् जागेवर निपटारा