कोरोनानं सगळं थांबलं, सर्वांना अन्न मिळावं म्हणून शेतकरी थांबला नाही, रब्बी हंगाम पूर्णत्वाकडं
एक वर्षाहून अधिक काळ कोरोना संसर्ग सुरु असला तरी देशातील शेतकऱ्यांनी कामात खंड पडू दिलेला नाही. Farmers and Agriculture Labourers worked during corona time
नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. 24 तासात 3 लाख 52 हजार 991 कोरोना रुग्ण आढळून आले तर 2812 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लाख 19 हजार जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दुसरीकडे कोरोना विषाणू संसर्गामुळे देशातील सर्व क्षेत्रांना फटका बसलाय. एक वर्षाहून अधिक काळ कोरोना संसर्ग सुरु असला तरी देशातील शेतकऱ्यांनी कामात खंड पडू दिलेला नाही. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामातील पिकांची काढणी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. (Farmers and Agriculture Labourers worked in farm during corona pandemic time for food reaches to everybody)
रब्बी हंगामात 315.80 लाख हेक्टर क्षेत्रावर गहू पेरण्यात आला होता. त्यापैकी जवळपास 81.55 टक्के गव्हाची कापणी करण्यात आली आहे. राज्यनिहाय माहिती घेतली असता राजस्थान मध्ये 99 टक्के कापणी पूर्ण झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये 96 टक्के, उत्तर प्रदेश 80 टक्के, हरियाणा 65 टक्के आणि पंजाबमध्ये 60 टक्के कापणी पूर्ण झाली आहे. हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये गहू कापणी सुरु आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत गहू कापणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर, 158.10 लाख हेक्टरवर लावण्यात आलेल्या गहू, डाळ,उडीद, मूग आणि मटरची कापणी पूर्ण झाली आहे.
ऊस तोडणी उद्यापही सुरुच
2020-21 मध्ये 48.52 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली होती. छत्तीसगड, कर्नाटक आणि तेलंगाणामधील ऊस तोडणी पूर्ण झाली आहे. तर, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये 92 ते 98 टक्के ऊसाची तोडणी पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशात 84 टक्के ऊसाची तोडणी झाली आहे.
धान कापणी देखील सुरु
आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगाणा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 45.32 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 18.73 लाख हेक्टरवरील धानाची कापणी झाली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये रब्बी हंगामातील धानाची कापणी पूर्ण झाली आहे.
संबंधित बातम्या:
कर्नाटक आंबा ‘देवगड हापूस’ नावानं विकणं महागात पडलं, पुण्यात तिघांवर कारवाई
रिस्क नव्हे उत्पन्न फिक्स! शेतीत चौपट उत्पादन वाढ, Multi Layer Farming एकदा करुन पाहाच!
(Farmers and Agriculture Labourers worked in farm during corona pandemic time for food reaches to everybody)