कांद्यानं पुन्हा बळीराजाला रडवलं, कांद्याच्या पंढरीत कांद्याच्या दराची लाली उतरली; काय आहे कारण?

नाशिक जिल्ह्यात कांदा बळीराजाला रडवतोय. बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कांद्यानं पुन्हा बळीराजाला रडवलं, कांद्याच्या पंढरीत कांद्याच्या दराची लाली उतरली; काय आहे कारण?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 7:45 AM

नाशिक : कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ( Onion Market )ओळख आहे. इतकंच नव्हे तर कांद्याच्या बाजारपेठेसाठी आशिया खंडातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून देखील नाशिकची ओळख ( Nashik News ) आहे. नाशिक मधील लासलगाव बाजार समिती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती, नाशिक बाजार समिती, यांसह येवला, मनमाड, उमराणे अशा बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. नाशिक मध्ये साधारणपणे दिवाळीच्या दरम्यान लाल कांदा बाजारात येऊ लागतो. तेव्हापासूनच कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून अखेरपर्यन्त कांद्याचे भाव वधारले नाही.

लाल कांद्याची आवक बघून बाजार समितीमध्ये कांद्याचे दर व्यापारी ठरवत असतात मात्र यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच कांद्याचे दर हे कमी प्रमाणात आहे. दोन तीन हजारापर्यंत असणारे दर आत्ताच्या घडीला हजार रुपयांच्या खाली येऊन ठेपले आहे.

त्यामुळे कवडीमोल भावाने कांदा आता शेतकर्‍यांना विकावा लागतोय. बाजार समितीमध्ये आल्यानंतर कांद्याची किंमत अत्यंत कवडीमोल भावात व्यापारी करत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.

हे सुद्धा वाचा

कांदा पीकासाठी झालेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः संताप व्यक्त करतोय. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ची ओळख आहे. तिथेही वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागील दोन आठवड्यापासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. अंदरसुल बाजार समितीत कालच्या बाजारभावाची स्थिती पाहता हजार रुपयांच्या आतमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कांदा पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवू लागला आहे. लाल कांद्याचे भाव सरासरी 900 रुपयांपर्यंत आले आहेत. त्यामध्ये किमान बाजारभाव 200 ते जास्तीत जास्त 1200 रुपयांपर्यंत भाव आले आहेत.

लाल कांदा हा साठवू शकत नाही. लाल कांदा हा टिकाऊ नसतो. त्याला लगचेच मोड येण्यास सुरुवात होते. याशिवाय खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उन्हाळ कांद्यासारखा लाल कांदा साठवता येत नाही. त्याचा एक फटका शेतकऱ्यांना बसतोय.

लासलगाव बाजार समितीसह इतर जिल्ह्यातील बाजार समितीत येणाऱ्या कांद्याची आवक बघता मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी उशिराने लागवड करण्यात आली होती. त्यामुळे एकाच वेळी कांद्याची आवक झाली आहे.

ही परिस्थिती सुधारेल अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. व्यापारी वर्गातही हा कांदा खरेदी करण्यावरून संभ्रम आहे. लाल कांद्याची मागणीही स्थिर असल्याने कांद्याचे दार वाढतील अशी स्थिती नाही असेही तज्ज्ञ सांगत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.