Fertilizer : खरीप पेरणी अंतिम टप्प्यात तरीही शेतकरी खताच्या प्रतिक्षेत..! तुटवड्याचे कारण ऐकूण चक्रावून जाताल
पिकांची वाढ आणि उत्पादनासाठी रासायनिक खताचा मारा हा गरजेचाच आहे. यावरच उत्पादन अवलंबून आहे. काळाच्या ओघात सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार केला जात असला तरी प्रत्यक्षात शेत शिवारातील स्थिती ही वेगळी आहे. आजही रासायनिक खताचा डोस दिला तरच उत्पादनात वाढ होणार आहे.
रत्नागिरी : (Kharif Season) खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात असतानाही रासायनिक खताचा प्रश्न हा कायम आहे. हंगामाच्या सुरवातीपासून जागतिक स्तरावरील परस्थिती आणि खतासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा तुटवडा यामुळे टंचाई निर्माण होणार याबाबत शंकाच नव्हती. पण रत्नागिरीमध्ये (Chemical Fertilizer) खताचा तुटवडा का निर्माण झाला यामागे रंजक कथाच आहे. एकीकडे पावसाने खरीप हंगाम लांबणीवर पडला आणि दुसरीकडे वेळेत खत पुरवठा न झाल्याने दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली होती. (Kokon) कोकणात रेल्वेच्या माध्यमातून खताचा पुरवठा केला जातो. यावर्षी अधिकच्या पावसामुळे रस्त्याचा पर्याय निवडण्यात आला होता. यातूनही वेळेत खताचा पुरवठा हा झाला नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 हजार मेट्रीक टन खताची प्रतिक्षा ही कायम आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
खरिपासाठी 14 हजार मेट्रीक टन खत मंजूर
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासू नये म्हणून कृषी विभागाने हंगाम सुरु होण्यापूर्वीच 14 हजार मेट्रीक टनाची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. हंगामाच्या सुरवातीला 11 हजार 121 मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला. पण त्यानंतर रेल्वेने होणारा पुरवठा हा रखडला होता. एकीकडे पावसाची रिपरिप आणि दुसरीकडे खताची शेतकऱ्यांना प्रतिक्षा. त्यामुळे यंदा खरिपाबाबत कोणतेच काम वेळेत झाले नाही. याचा उत्पादनावर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. उर्वरित खताच्या पुरवठ्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न हे सुरु आहेत.
खत टंचाईमुळे शेतकऱ्यांची गैरसोय
पिकांची वाढ आणि उत्पादनासाठी रासायनिक खताचा मारा हा गरजेचाच आहे. यावरच उत्पादन अवलंबून आहे. काळाच्या ओघात सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार केला जात असला तरी प्रत्यक्षात शेत शिवारातील स्थिती ही वेगळी आहे. आजही रासायनिक खताचा डोस दिला तरच उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, पेरणीसाठीच खताची आवश्यकता असताना रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही प्रतिक्षा करावी लागत आहे.
उत्पादनावर काय परिणाम?
कोकणामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय काही भागात पावसामुळे भात लागवडही रखडलेली आहे. भर पावसात खताविना लागवड झाली तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे वेळेत खत मिळाले तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे. कृषी विभागाच्या मनमानी कारभारामुळेच खत वेळेत पुरवले गेले नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. तर दुसरीकडे वेळेत खत पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.