कांद्याला मातीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत, शेतकऱ्याने घेतली टोकाची भूमिका

नैताळे गावातील तरुण कांदा उत्पादक शेतकरी सुनील बोरगुडे दोन एकरावरील जोमदार कांदा पिकावर मातीमोल कांद्याला बाजार भाव मिळत असल्याने नैराश्येपोटी कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवत असल्याची इतर शेतकऱ्यांना माहिती मिळाली.

कांद्याला मातीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत, शेतकऱ्याने घेतली टोकाची भूमिका
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 1:00 PM

उमेश पारीक, नाशिक : दोन ते चार रुपये इतका कांद्याला मातीमोल बाजार भाव (MARKET RATE) मिळत असल्याने कांदा पीक (Onion crop) शेतातून काढून बाजारपेठेत विक्रीसाठी नेणे परवडत नसल्याने कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील तरुण शेतकऱ्याने वैतागून दोन एकरावरील पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या जोमदार कांदा पिकावर रोटर फिरवला आहे. कांद्याचं पीक भुईसपाट करत मातीमोल मिळणाऱ्या कांदा बाजार भावाचा निषेध व्यक्त करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर (NASHIK FARMER) आली आहे.

कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवला

नैताळे गावातील तरुण कांदा उत्पादक शेतकरी सुनील बोरगुडे यांनी आपल्या शेतात दोन एकरावर कांद्याचे पीक घेतले आहे. तीन महिन्यात एक ते सव्वालाख रुपये खर्च करत पोटच्या पोराप्रमाणे कांद्याचे पीक जोमदार वाढवले. पण देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत असल्याने आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव सह राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजार भाव दोन ते चार रुपये कोसळले आहेत. उत्पादन खर्च तर दूरच शेतातून कांदा काढणी मजुरी आणि वाहतूक खर्च ही निघणार नसल्याने हवालदिल झालेल्या बोरगुडे यांनी नैराश्यापोटी आपल्या दोन एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या जोमदार कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवला आहे. केंद्र व राज्य सरकारने इतर प्रश्नापेक्षा शेतकर्यांकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नसल्याचे सुनील बोरगुडे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

इतर शेतकऱ्यांनी धाव घेतली, पण…

नैताळे गावातील तरुण कांदा उत्पादक शेतकरी सुनील बोरगुडे दोन एकरावरील जोमदार कांदा पिकावर मातीमोल कांद्याला बाजार भाव मिळत असल्याने नैराश्येपोटी कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवत असल्याची इतर शेतकऱ्यांना माहिती मिळाली. त्यानंतर इत शेतकरी त्या ठिकाणी शेतावर पोहोचले रोटर न फिरवण्याची विनंती केली. मात्र ही विनंती बोरगुडे यांनी न ऐकता रोटर फिरवणे सुरूच ठेवल्याने संपूर्ण कांदा पीक हे भुईसपाट करत रान मोकळे केले आहे. केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांकडे लक्ष देण्याची मागणी करत असून विक्री झालेल्या कांद्याला 10 रुपये अनुदान तर विक्री होणार्या कांद्याला 30 हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरु लागली आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी संजय साठे यांनी दिली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.