औषधी चिया बियाणे : कमी वेळेत अधिकचा नफा, कळंबच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

शेती व्यवसयातून उत्पन्न वाढीसाठी शेतरकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात झालेल्या पीक पध्दतीमधील बदलातून ते समोरही आले आहे. मात्र, इतरांपेक्षा वेगळे करुन दाखवले आहे ते जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नामदेव माकोडे या शेतकऱ्याने.

औषधी चिया बियाणे : कमी वेळेत अधिकचा नफा, कळंबच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
औषधी चिया बियाणांचे क्षेत्र मराठवाड्यात वाढत आहे.
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 2:42 PM

उस्मानाबाद : शेती व्यवसयातून उत्पन्न वाढीसाठी शेतरकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. यंदाच्या (Summer Season) उन्हाळी हंगामात झालेल्या पीक पध्दतीमधील बदलातून ते समोरही आले आहे. मात्र, इतरांपेक्षा वेगळे करुन दाखवले आहे ते जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नामदेव माकोडे या शेतकऱ्याने. त्यांनी (Ayurvedic Medicines) आयुर्वेदिक औषधे असणारे (Chia Seeds) चिया बियाणाचे उत्पन्न घेतले आहे. या प्रयोग जिल्ह्यासाठी वेगळा असला तरी त्यांनी तीन महिन्यांमध्ये यशस्वी करुन दाखवला आहे. राज्यातील बाजारपेठांमध्ये या बियाणांना मोठ्या प्रमाणात मागणी असून बाजारपेठेचा अभ्यास करुन हे पीक घेण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे परस्थिती प्रतिकूल असली तरी शेतकरी हे नवनविन प्रयोग करुन उत्पन्न वाढवण्याचा कसा प्रयत्न करतात हेच यामधून समोर आले आहे.

चिया बियाणे म्हणजे नेमके काय?

पारंपरिक पिकांपेक्षा आता ज्यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल अशाच पिकांवर युवा शेतकऱ्यांचे लक्ष आहे. त्यानुसारच कळंब सारख्या तालुक्यातील शिराढोणच्या शिवारात चिया बियाणाचे पिक बहरत आहे. चिया बियाणे हे इतर खाद्य बियाणा प्रमाणेच आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या पोषक आणि औषधी गुणधर्मामुळे खाण्यामध्ये त्याचा वापर करतात. आरोग्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी याचा अधिकचा उपयोग होतो. चिया बियाणांचा आकार खूप बारीक असून बियाणांचा रंग हा पांढरा, तपकिरी किंवा काळा असतो.

वेळेची बचत अन् खर्चही कमी

चिया बियाणांची लागवड केल्यापासून तीन महिने 15 दिवसांमध्ये उत्पादन मिळते. नामदेव माकोडे यांनी चिया बियाणे हे हरियाणा येथून ऑनलाईनद्वारे मागवून घेतले होते. नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यात आली होती तर आता हे पीक अंतिम टप्प्यात आहे. साडेतीन एकरातील या पिकासाठी माकोडे यांना केवळ 12 हजार रुपये खर्च आलेला आहे. यामध्ये त्यांना 2 लाखाचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे.

चिया बियाणांमध्ये औषधे गुणधर्म

चिया बियाणांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते, चिया बियाणांमध्ये पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जस्त, तांबे, सोडियम फॉस्फरस, मॅगनिज आदी पोषक तत्त्व असतात. यामुळे चिया बियाणांना अधिकची मागणी असते. विशेष म्हणजे बारामाही महिने या बियाणांना मागणी असते. त्यामुळे दर हे टिकून असतात. कमी वेळेत अधिकचे उत्पन्न यासाठी हा योग्य पर्याय असून या भागातही उत्पादन घेता येत असल्याचे माकोडे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : कोरोनामुळे शेतीचा जोडव्यवसयाच धोक्यात, परिस्थितीने धवल क्रांतीवर ‘विरझण’

Fertilizer Rate: …म्हणून भारतामध्ये सर्वाधिक खताचे दर, काय आहेत कारणे..?

Sugarcane Sludge: राज्यात ऊस गाळप अंतिम टप्प्यात, साखर आयुक्तांच्या काय आहेत सूचना? वाचा सविस्तर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.