Yavtamal : शेतकऱ्यांनो सावधान, बनावट खतेच नव्हे तर किटकनाशकही बाजारात, खरेदी करताना अशी घ्या काळजी..!

जिल्ह्यात बनावट खत, बियाणांमधून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुकास्तरावर कृषी विभागाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. पांढरवाडा तालुक्यातून याबाबत तक्रार दाखल होताच भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी याचा शोध घेण्यास सुरवात केली. तर जावेद अन्सारी आणि दिनेश कुंडलवार हे गुजरात व तेलंगाना राज्यातून आणलेल्या बोगस किटकनाशक व बनावट खताची विक्री करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Yavtamal : शेतकऱ्यांनो सावधान, बनावट खतेच नव्हे तर किटकनाशकही बाजारात, खरेदी करताना अशी घ्या काळजी..!
यवतमाळ जिल्ह्यात बनावट खत आणि किटनाशके विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 11:29 AM

यवतमाळ : आतापर्यंत (fake fertilizer) बनावट खत आणि बोगस बियाणे बाजारात दाखल होत होते पण आता (Kharif Season) खरिपातील पेरण्या उरकताच बनावट किटकनाशकही दाखल झाले आहेत. त्यामुळे खतासह (Purchase of pesticides) किटनाशकांची खरेदी करताना शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात बनावट कीटकनाशक आणि खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 7 लाख 26 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. शेतकरी खरिपाच्या लगबगीत असताना बनावट कीटकनाशके विक्री करुन त्याची फसवणूक तर होणारच आहे पण पिकांनाही याचा धोका आहे.

अशी झाली कारवाई

जिल्ह्यात बनावट खत, बियाणांमधून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुकास्तरावर कृषी विभागाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. पांढरवाडा तालुक्यातून याबाबत तक्रार दाखल होताच भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी याचा शोध घेण्यास सुरवात केली. तर जावेद अन्सारी आणि दिनेश कुंडलवार हे गुजरात व तेलंगाना राज्यातून आणलेल्या बोगस किटकनाशक व बनावट खताची विक्री करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अडीच लिटरच्या डब्यामध्ये या किटकनाशकाची आणि रासायनिक खताची साठवणूक केली जात होती. यासंबंधी जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे यांच्य्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियंत्रण अधिकारी शिवा जाधव कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

खत खरेदी करताना अशी घ्या काळजी

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात. त्यामुळे केवळ खरेदी करताना काळजी घेतली तर फसवणूक टळणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात अशा पध्दतीने बोगस खत आणि किटकनाशकांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे.

हे सुद्धा वाचा

7 लाख 26 हजाराचा मुद्देमाल जप्त

गुजरात व तेलंगणा येथून अडीच लिटरच्या डब्यामध्ये बोगस किटकनाशक हे पांढरकवडा येथे दाखल होत असत. यातूनच वेगवेगळी पॅकिंगकरुन ते शेतकऱ्यांच्या माथी मारले जात होते. तर याच भागातून बनावट खतेही आणली जात होती. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा हे विक्रेत्ये घेत होते. मात्र, यासंबंधी तक्रार दाखल होताच कारवाई करण्यात आली आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.