Buldhana : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, आता मुलांचे शिक्षण, वर्षभराचा खर्च कसा भागवायचा, शेतकऱ्यांसमोर…

| Updated on: Apr 17, 2023 | 8:47 AM

मकरध्वज खंडाळा येथील जवळपास 65 शेतकऱ्यांची शेतमाल घेऊन गाडे बंधूंनी फसवणूक केली आहे. कोणाचे पाच लाख, कोणाचे बारा लाख रुपये, तर कोणाचे सात लाख रुपये आहेत.

Buldhana : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, आता मुलांचे शिक्षण, वर्षभराचा खर्च कसा भागवायचा, शेतकऱ्यांसमोर...
farmer news (2)
Image Credit source: tv9marathi
Follow us on

गणेश सोळंकी, बुलढाणा : चिखली (Chikhali) येथील व्यापारी संतोष गळे, अंकुश गाडे आणि त्यांचा साथीदार या तिघांनी मिळून जिल्ह्यातील जवळपास 300 शेतकऱ्यांचां शेतमाल (Agricultural goods) घेऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उजेडात आल्यापासून त्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर त्यांनी आता पोबारा केल्यामुळे शेतकऱी (Buldhana Farmer) हवालदील झाले आहेत. हातात काहीचं पैसे नसल्यामुळे पोलिसांसमोर ते व्यथा मांडत आहेत. त्यामुळे आता पुढील घर खर्च, दवाखाना, मुलांचे शिक्षण कसे करायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांना प्रशासनाने तात्काळ अटक करून आमचे पैसे आम्हाला मिळवून द्यावे, अशी विनवणी शेतकरी करीत आहे. संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे…

चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथील गजानन ठेंग हे शेतकरी घरची शेती करुन मोलमजुरी करतात. तर काही शेतकरी गजानन थेंग यांनी सुद्धा आपली सोयाबीन गाडे बंधूंना विकली होती. त्यांच्याकडे पावणे दोन लाख रुपये असून , वारंवार चकरा मारल्या. मात्र सहा महिने उलटले तरीही पैसे मिळाले नाही आणि आता गाडे बंधुसह त्यांचा साथीदार पैसे घेऊन फरार झाले आहेत. घरात दोन मुले, त्यांचे शिक्षण, घराचा खर्च, दवाखाना कसा करायचा, याचं चिंतेत गजानन ठेंग आणि त्यांचे कुटुंब जगत आहे. आता खरीप पिकाची पेरणी सुद्धा आली आहे, आता काय करायचं हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. त्यांच्यासमोर आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी ठेंग् सांगतात.

हे सुद्धा वाचा

प्रशासनाने यात लक्ष घालण्याची मागणी

मकरध्वज खंडाळा येथील जवळपास 65 शेतकऱ्यांची शेतमाल घेऊन गाडे बंधूंनी फसवणूक केली आहे. कोणाचे पाच लाख, कोणाचे बारा लाख रुपये, तर कोणाचे सात लाख रुपये आहेत. त्यांनी सुद्धा अनेकवेळा गाडे यांच्याकडे चकरा मारल्या. मात्र, आज देतो उद्या देतो म्हणत वेळ मारत नेली आणि आता न्यायालयात फरार घोषित करावे म्हणून अर्ज केलाय. त्यामुळे न्यायालयाने जर या गाडे बंधूंना फरार घोषित केले. तर या शेतकऱ्यांचे पैसे मिळणार नाही. त्यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालण्याची मागणी या पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.