Latur Market : पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली, आठ दिवसानंतर सोयाबीनच्या दरात झाला बदल

खरीप पिकांचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी सोयाबीनचे काय झाले? हा प्रश्न कानी पडतोच. कारण सोयाबीनची साठवणूक शेतकऱ्यांकडे असल्यामुळे दर वधरणार की कमी होणार याकडे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे लक्ष आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीन हे 7 हजार 350 वर स्थिरावले होते. त्यामुळे आवकवरही त्याचा परिणाम झाला होता. मंगळवारी मात्र यामध्ये बदल झाला आहे. सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाली असून त्याचा परिणाम आवकवर होणार हे पहावे लागणार आहे.

Latur Market : पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली, आठ दिवसानंतर सोयाबीनच्या दरात झाला बदल
आठ दिवसानंतर सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 2:38 PM

लातूर : खरीप पिकांचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी (Soybean Rate) सोयाबीनचे काय झाले? हा प्रश्न कानी पडतोच. कारण  (Soybean Stock) सोयाबीनची साठवणूक शेतकऱ्यांकडे असल्यामुळे दर वधरणार की कमी होणार याकडे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे लक्ष आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीन हे 7 हजार 350 वर स्थिरावले होते. त्यामुळे आवकवरही त्याचा परिणाम झाला होता. मंगळवारी मात्र यामध्ये बदल झाला आहे. सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाली असून त्याचा परिणाम आवकवर होणार हे पहावे लागणार आहे. दर स्थिर असल्यामुळे (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 18 ते 20 हजार पोत्यांची आवक ही सुरुच होती. असे असले तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन हे राखून ठेवलेले आहेच. हंगामाच्या शेवटी सोयाबीनमध्ये विक्रमी वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच साठवणूकीचे धाडस केले जात आहे. शिवाय सोयाबीन अधिकचा काळ साठवून ठेवले तरी काही परिणाम होत नाही किंवा वजनातही घट होत नाही.

100 रुपयांनी दरात घसरण

सोयाबीनची आवक सरासरी एवढीही नाही. असे असताना सोयाबीनच्या दराचे काय झाली याची उत्सुकता सर्वानाच लागेलेली आहे. एकीकडे रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी झाली की विक्री करण्याचा धडाका शेतकऱ्यांनी सुरु केला मात्र, सोयाबीनबाबत सावध भूमिका बाळगली जात आहे. असे असतानाच मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7 हजार 350 वरील सोयाबीन हे 7 हजार 250 येऊन ठेपले आहे. त्यामुळे असेच टप्प्याटप्प्याने दर कमी झाले तर हे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ठरत आहे. मध्यंतरी 7 हजार 600 वर गेलेले सोयाबीन आता 7 हजार 250 रुपयांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा निर्णय बरोबर की चुकीचा हे तर येणारा काळच ठरवणार आहे.

तुरीला हमीभावापेक्षा अधिकचा दर

खरीप हंगामातील तुरीचीही आवक सुरु झाली आहे. आतापर्यंत खरेदी केंद्रावरील दराप्रमाणेच खुल्या बाजारात तुरीला दर होते. पण गेल्या चार दिवसांमध्ये तुरीच्या दरात वाढ झाली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 6 हजार 650 चा दर मिळाला आहे तर खरेदी केंद्रावर 6 हजार 300 असा दर ठरवून देण्यात आलेला आहे. शिवाय हरभऱ्याचे दर हे 4 हजार 500 वरच स्थिर आहेत. सध्या रब्बी हंगामातील हरभरा तर खरिपातील सोयाबीन आणि तुरीची अधिकची आवक सुरु आहे.

हरभरा आता खरेदी केंद्रावर

राज्यात सर्वत्र आता हरभरा खरेदी केंद्र ही सुरु झाली आहेत. आतापर्यंत शेतकरी हे खुल्या बाजारात हरभऱ्याची विक्री करीत होते. पण बाजारपेठेतील दरात सुधारणा नाही शिवाय खरेदी केंद्राच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी हरभरा विक्रीची सोय झाली आहे. त्यामुळे केंद्रावरील वाढते दर आणि गावाजवळच झालेली सोय यामुळे हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची रेलचेल पाहवयास मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Onion Rate : कांदा दराचा लहरीपणा आता शेतकऱ्यांच्या मुळावर, 15 दिवसांमध्येच बदलले चित्र

…म्हणे महिला शेतकरी सन्मान वर्ष, सन्मान सोडाच- शेतकरी महिलेच्या कष्टाचीही कदर नाही..!

Photo Gallery : सरकार निर्णयाचे ‘असे’ हे स्वागत, जळगावात केळीच्या खोडाचे पूजन अन् जंगी मिरवणूक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.