या जातीचा आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची होतेय चांगली कमाई, जाणून घ्या कारण

YAKRUTH MANGO : सध्या आंब्याचा सीजन सुरु आहे. त्यामुळे बाजारात सध्या विविध जातीचे आंबे उपलब्ध आहेत. काही आंबे लोकांना इतके आवडतात, त्यासाठी लोकं कितीही किंमत मोजायला तयार असतात.

या जातीचा आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची होतेय चांगली कमाई, जाणून घ्या कारण
YAKRUTH MANGO NEWS IN MARATHIImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 12:55 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश राज्यातील बारांबकी जिल्ह्यातील वाढती यकुति आंब्याची (YAKRUTH MANGO) शेती देशात आणि परदेशात अधिक प्रसिध्द आहे. यकुति नावाच्या आंब्याला सध्या अधिक मागणी आहे. ज्या शेतकऱ्यांनी (YAKRUTH MANGO NEWS IN MARATHI) यकुती आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे, त्यांना प्रत्येकवर्षी १५ ते २० लाख रुपयांचा फायदा होतो. महाराष्ट्रात (MAHARASHTRA ALFANSO MANGO SEASON) सुध्दा काही आंब्याच्या जाती अधिक प्रसिध्द आहेत. कोकणातील आंब्याची चळ वेगळी असल्यामुळे लोकांना कोकणातील आंबे अधिक आवडतात.

पाच वर्षात यकुती आंब्याचं झाडं फळ देतं

प्रसिध्द यकुती आंब्याचं झाडं फळ द्यायला सुरुवात करतं. त्या झाडापासून तुम्ही कित्येक वर्षे फळं मिळवू शकता. त्या आंब्याच्या एका झाडाला लावयला साधारण पाच हजार रुपये पर्यंतचा खर्च येतो. यकृती जातीचा आंबा बाजारात दीडशे ते दोनशे रुपये किलोने मिळतो. प्रत्येक सीजनमध्ये शेतकऱ्यांना आंबे विक्रीतून लाखो रुपयांचा फायदा होतो.

आंब्यांची लागवड वाढली

बाराबंकीमध्ये आम्रपाली, लगंडा, दशहरी या सुध्दा आंब्यांच्या जाती अधिक प्रसिध्द आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये आंब्यांचं अधिक उत्पन्न होतं. यावर्षी आंब्याचं उत्तन्न लाखो टनात निघालं आहे. लखनऊ, गोंडा, बहराइच, फैजाबाद, गोरखपूर इत्यादी ठिकाणी हे आंबे पाठवण्यात आले आहेत. दररोज १५ ते २० ट्रक आंब्यांची विक्री होते.

हे सुद्धा वाचा

आंबा बागेचे मालक म्हणतात…

बारांबंकी येथील आंब्याची देखरेख करणारे शेतकरी शाकेब आणि अकबर म्हणतात की, आम्ही मागच्या वीस वर्षापासून आंब्याच्या बागेचं काम करीत आहोत. यावेळी त्यांनी एक बाग 12 लाख रुपयांना विकत घेतली आहे. विशेष म्हणजे तिथं पीक सुध्दा चांगले आले आहे. सगळं काही व्यवस्थित राहिल्यास आम्हाला त्यातून १५ ते २० लाख रुपयांचा फायदा होईल.

काय म्हणतात अधिकारी ?

बारांबकी जिल्ह्यातील कृषी अधिकारी महेश श्रीवास्तव यांनी सांगितलं की, 12 हजार हेक्टरवरती आंब्याची बाग लावण्यात आली आहे. त्यामध्ये यामध्ये किडवई कुटुंबाने, मोठी शेती करणाऱ्यांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर आंबा बागेत 5 वर्षे मेहनत केल्यानंतर त्यांना ५० वर्षे नफा मिळवता येतो. सर्वसामान्य बाजारात यकुती आंबा मोठ्या प्रमाणात विकला जातो.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.