शनिवार विशेष : नव्या वर्षात तरी शेतीला दिवसा वीज मिळणार का? शेतकऱ्यांना दिलासा मिळेल?

शेतीसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (electricity for irrigation )

शनिवार विशेष : नव्या वर्षात तरी शेतीला दिवसा वीज मिळणार का? शेतकऱ्यांना दिलासा मिळेल?
नव्या वर्षात शेतकऱ्यांना वीज दिवसा मिळेल का?
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 2:18 PM

मुंबई : 2020 च आव्हानात्मक वर्ष संपून 2021 वर्ष सुरु झाले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेले पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन नव्या वर्षातही सुरु आहे. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये 4 जानेवारील बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील शेतीसाठी करण्यात येणारा वीज पुरवठा( Electricity for Agriculture) दिवसा करावा, ही मागणी शेतकरी करत आहेत. नव्या वर्षात तरी राज्यातील शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल का हा प्रश्न कायम आहे. शेतीसाठी रात्री करण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्या ऐवजी दिवसा वीज उच्चदाबानं वीज द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. (Why Farmers demand electricity on day for irrigation)

शेतील दिवसा अखंडित वीज का पाहिजे?

राज्यामध्ये असणारी विजेची तूट भरुन काढण्यासाठी शेतीला दिवसाच्या 24 तासांपैकी फक्त 8 तास वीज मिळते. ही वीजदेखील सलगपणे देण्यात येत नाही. राज्यातील काही भागांमध्ये आठवड्यातील तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री असा वीज पुरवठा करण्यात येतो. उदा. रविवार ते बुधवार या दिवशी रात्री 10.30 ते सकाळी 08.30 आणि गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार यादिवशी सकाळी 09.30 ते सायंकाळी 5.30, असा वीज पुरवठा कऱण्यात येतो. मराठावड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सलग एक आठवडा दिवसा आणि एक आठवडा रात्री असा वीज पुरवठा शेतीसाठी होतो.

रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या जीविताला धोका

नोव्हेंबर महिन्यात जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली होती. दिवाळीमध्ये पळसखेडा पिंपळे गावातील तीन सख्खे भाऊ रात्री शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता एकाला विजेचा धक्का लाागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले दोघा भावांनादेखील विजेचा धक्का बसला. यामध्ये तिघांनाही जीव गमवावा लागला. यानंतर शेतीला दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करावा, ही शेतकऱ्यांच्या मागणी पुन्हा एकदा पुढे आली. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. रात्री शेताला पाणी द्यायला जाताना शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. बिबट्याचा वावर, साप, वन्य प्राणी, विंचू, वीजेची तुटलेल्या तारा या सर्वांचा धोका असल्यामुळं शेतकऱ्यांनी जगावं कसा,असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! ऐन दिवाळीत सख्ख्या तीन भावांचा शॉक लागून मृत्यू

मराठवाडा ते विदर्भ शेतकऱ्यांची दिवसा वीज देण्याची मागणी

विदर्भातील शेतकऱ्यांपुढे रब्बी हंगामातील पिकांना सिंचन कसं करायचं हा प्रश्न आहे. विहिरीत पाणी आहे पण शेताला पाणी देता येत नाही अशी स्थिती आहे. विदर्भात सध्या कडाख्याची थंडी आहे, या थंडीत रात्रीच्या अंधारात पाणी कसं द्यायचं, असा प्रश्न विदर्भातील शेतकऱ्यांपुढे आहे. खरिप हंगाम हातातून गेला आता रब्बी हंगामाला पाणी देण्यासाठी दिवसा किंवा रात्री मिळणारी वीजही सलगपणे मिळत नाही. एका तासामध्ये तीन तीन वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो, असं शेतकऱ्यांचा अनुभव आहे. (Why Farmers demand electricity on day for irrigation)

शेतीला दिवसा होणारा वीज पुरवठाही वारंवांर खंडित

तीन ते चार दिवस दिवसा मिळणारी वीज देखील सलगपणे मिळत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. यामुळं शेतीला पाणी देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. बऱ्याच वेळा दिवसा करण्यात येणाऱ्या वीजेचा दाब कमी असतो. याचा परिणामही होतो. दिवसाच्या तुलनेत रात्री होणारा वीज पुरवठा उच्च दाबाचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन रात्री शेतीला सिंचन करावं लागते.

दिवसा वीज पुरवठा करण्यावर ऊर्जा मंत्र्यांची भूमिका 

रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना वीज कशी द्यावी याची कार्यपद्धती तयार झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व विभागातील मुख्य विद्युत अभियंत्याना सूचना दिलेल्या आहेत. ते रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करतील, असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीपूर्वी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली होती.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत काय म्हणाले?

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा; रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार

कृषी मंत्र्यांचेही आश्वासन

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिलं होते.

दरम्यान, शेतीसाठी होणारा वीज पुरवठा दिवसा करण्यात यावा म्हणून शेतकरी, शेतकरी संघटना, सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली आहेत. नव्या वर्षामध्ये तरी शेतीला दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याचा निर्णय होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या:

Nagpur | कडाक्याच्या थंडीत रात्री सिंचन कसं करायचं? ऊर्जामंत्र्यांना सवाल

(Why Farmers demand electricity on day for irrigation)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.