शेतकऱ्यांची मंदीत-संधी, जे मुख्य पिकांतून मिळाले नाही ते हंगामी पिकांतून पदरी पडणार का?
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच पण रब्बीवरही अवकाळीचा परिणाम झाला आहे. यंदा मुख्य पिकांमधूनच शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकरी उत्पादनवाढीसाठी एक ना अनेक प्रयत्न केलेले आहेत. यापैकीच एक कलिंगडची शेती.
अकोला : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच पण रब्बीवरही (Untimely Rain) अवकाळीचा परिणाम झाला आहे. यंदा मुख्य पिकांमधूनच शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकरी उत्पादनवाढीसाठी एक ना अनेक प्रयत्न केलेले आहेत. यापैकीच एक (Watermelon) कलिंगडची शेती. अकोला जिल्ह्यात एकीकडे रब्बीचा पेरा होत असताना दुसरी शेतकरी कलिंगडाची लागण करीत होते. आता (Rabi Season) रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत तर कलिंगड काढणीला आले आहे. शिवाय उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच यंदा कलिंगडला मागणी होती. त्यामुळे यंदा खरीप आणि रब्बी हंगामातील मुख्य पिकांमधून शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. तर दोन महिन्याचे कलिंगड आता शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी सज्ज झाले आहे.
डिसेंबरमध्ये लागण अन् फेब्रुवारीमध्ये काढणी
कलिंगड हे हंगामी पीक आहे. पूर्वी कलिंगडाची लागवड केवळ नदी पात्रात केली जात होती. मात्र, काळाच्या ओघाच सिंचनाची आणि निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करुन शेतकऱ्यांनी पीक घेण्यास सुरवात केली आहे. अधिकतर उत्पादन हे अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा या तालुक्यातील काही भागांमध्ये घेतले जाते. सध्या अकोला जिल्ह्यामध्ये 300 हेक्टरावर कलिंगडची लागवड करण्यात आली होती. आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आवक सुरु होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लागवडीपूर्वीच बाजारपेठेचा बांधला जातो अंदाज
शेतकरी आता कमर्शियल झाला आहे. केवळ लागवड करायची म्हणून नाही तर त्या पिकातून चार पैसे मिळतील या हिशोबाने शेती केली जात आहे. कलिंगडला शक्यतो उन्हाळ्यात मागणी असते. शिवाय हे पीक दोन ते अडीच महिन्याचे आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये लागवड आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात तोडणी या सर्व बाबींचा विचार करुनच शेतकऱ्यांनी कलिंगडचे उत्पादन घेतले आहे. आता यामधून तरी उत्पादन वाढेल असा आशावाद आहे.
दराबाबत शेतकऱ्यांना विश्वास
कलिंगड हे हंगामी पीक आहे. त्यामुळे दरवर्षी याला अधिकची मागणी असते. यंदा तर कडाक्याची थंडी असतानाही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मागणी होती. आता तर उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली आहे. सध्याचे कलिंगडचे दर हे 30 रुपये किलोवर गेले आहेत. शिवाय यंदा कोरोनाचा धोकाही नाही. त्यामुळे दरात अणखीन वाढ होईल असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. कलिंगडाची मागणी दरवर्षी कायम राहिलेली आहे. यंदाही अशी मागणी असावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
संबंधित बातम्या :
सावरा अन्यथा सरकार ढासळेल, राजू शेट्टींच्या पत्रात दडलंय काय ?
गाळपाअभावी शिल्लक ऊसाला जबाबदार कोण..! साखर आयुक्तांच्या पत्रामुळे लागणार का प्रश्न मार्गी?