Smart Farmer : सोयाबीन, कापसाप्रमाणेच तुरीचीही स्थिती, शेतकऱ्यांचा ‘प्लॅन’ होणार का यशस्वी?
उत्पादनात घट होऊनही दर कसा मिळत नाही? याबाबत आता शेतकऱ्यांनीच अभ्यास सुरु केला आहे. एवढेच नाही तर सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत नेमके काय झाले हे आता सर्वांसमोरच आहे. उत्पादन घटूनही दर मिळत नसेल तर शेतीमालाची विक्रीच कशाला अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. यामुळेच आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीन आणि कापसाला विक्रमी दर मिळत आहे. यंदा शेंग पोखरणारी अळी आणि तूर काढणीच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता.
लातूर : उत्पादनात घट होऊनही दर कसा मिळत नाही? याबाबत आता (Farmer) शेतकऱ्यांनीच अभ्यास सुरु केला आहे. एवढेच नाही तर सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत नेमके काय झाले हे आता सर्वांसमोरच आहे. उत्पादन घटूनही दर मिळत नसेल तर (Sale of agricultural goods) शेतीमालाची विक्रीच कशाला अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. यामुळेच आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीन आणि कापसाला विक्रमी दर मिळत आहे. यंदा शेंग पोखरणारी अळी आणि (Tur Harvesting) तूर काढणीच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. असे असतानाही हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत दर कमी असल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी तूर साठवणूकीवर भर दिला आहे. त्याचाच परिणाम गतआठवड्यात तुरीच्या दरावर झालेला होता. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूरीचे दर हे 100 रुपायंनी वाढलेले आहेत. त्यामुळे जी पध्दत शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाबाबत राबवली तीच पध्दत आता तुरीसाठी का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
आठवड्याभरात तुरीच्या दरात सुधारणा
शेतीमालाची आवक कमी झाली की, त्याचा परिणाम हा दरावर होणारच. शिवाय यंदा खरिपातील पिकांते उत्पादन घटले असतानाही वाढीव दर कसा नाही. त्यामुळे शेतकरी शेतीमाल विक्रीपूर्वी बाजारपेठेतील दराची माहिती करुन घेत आहेत. हंगाम सुरु होऊनही लातूर बाजार समितीमध्ये अपेक्षित आवक नसल्याने आता प्रक्रिया उद्योजक आणि स्टॉकिस्ट यांनी तूर खरेदीला सुरवात केली आहे. त्यामुळेच गतआठवड्यात तुरीच्या दरात 100 रुपायांची सुधारणा झाली आहे. यातच तूरदाळीला उठाव मिळाल्यानेही त्याचा दरावर परिणाम झाला आहे.
हमीभावप्रमाणेच खुल्या बाजारातही तुरीला दर
नाफेडच्या वतीने राज्यभर तूर खरेदी केंद्र ही उभारली गेली आहेत. पण खरेदी केंद्र सुरु होताच 5 हजार 800 असलेली तूर थेट 6 हजार 200 वरच येऊन ठेपली. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी हमीभावाप्रमाणेच दर दिला त्यामुळे हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेमध्येच तुरीची अधिकची खरेदी होत आहे.हमीभाव केंद्रावरील नियम-अटी आणि महिन्याभराच्या कालावधीनंतर पैसे पदरी पडणार या जाचक अटींमुळे खुल्या बाजारात तुरीची अधिक विक्री होत आहे.
आवक घटली तर दरात सुधारणाच
सध्या देशभरात 5 हजार 900 ते 6 हजार 600 पर्यंत तुरीचे दर आहेत. असे असले तरी तुरीची आवक ही नियंत्रणातच सुरु आहे. चांगला दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक हेच धोरण शेतकऱ्यांनी स्वीकारलेले आहे. त्यामुळे आवक कमी असताना प्रक्रिया उद्योजक आणि स्टॉकिस्ट हे अधिकच्या दराने खरेदी करीत आहेत. सध्या हमीभावाच्या बरोबरीने खुल्या बाजारात दर आहेत. मात्र, आवक अशीच राहिली तर दरात वाढ होणार हे नक्की.
संबंधित बातम्या :
अतिवृष्टीने खरिपाचे नुकसान रब्बीला जीवदान, नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पाची काय आहे स्थिती?
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महासंग्राम मेळावा
Red Chilly : मिरचीचे उत्पादन घटले दर वाढले, लाल मिरचीच्या आगारात काय आहे चित्र ?