Osmanabad : काय सांगता..? आगाऊ रकमेचा शेतकऱ्यांना मिळणार फायदा..! काय आहे पीक विमा योजनेत तरतूद?
पावसामुळे झालेले नुकसान पाहता आता आपत्ती निवारण निधीच्या निकषाप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे असले तरी पीकविमा योजनेत एक वेगळी तरतूद आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निकषानुसार ज्या हंगामादरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे 50 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्यास ही मदत केली जाते. त्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसानभरपाईच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याची महत्वाची तरतूद यामध्ये आहे.
उस्मानाबाद : पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. मध्यंतरी आठ दिवस पावसाने उसंत दिल्यानंतर पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. पीक पाहणी, पंचनामे आणि नंतर मदतीची प्रक्रिया हे सर्व लांबणीवर पडणार असल्याने आग्रिम (Amount of compensation) नुकसानभरपाईची रक्कम बाधित (Crop Insurance) पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. त्यामुळे पंचनाम्यापूर्वीच शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25 टक्के रक्कम ही मिळू शकते. त्यासाठी लोकप्रतिनीधी प्रयत्न करीत असून सततच्या पावसामुळे आता उत्पादनाबाबतही आशा मावळलेल्या आहेत. अशा परस्थितीमध्ये त्वरीत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे.
काय आहे नेमकी तातडीच्या मदतीची प्रक्रिया?
पावसामुळे झालेले नुकसान पाहता आता आपत्ती निवारण निधीच्या निकषाप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे असले तरी पीकविमा योजनेत एक वेगळी तरतूद आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निकषानुसार ज्या हंगामादरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे 50 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्यास ही मदत केली जाते. त्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसानभरपाईच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याची महत्वाची तरतूद यामध्ये आहे. त्यामुळे या रकमेचा शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. यासंबंधी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनीही आढावा घेतला आहे.
काय आहेत अधिकाऱ्यांना सूचना?
शेतकऱ्यांना आग्रिम नुकसानभरापई मिळावी यासाठी कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी यांनी पिकांची पाहणी करणे गरजेचे आहे. कृषी विभागाबरोबरच विमा कंपनीच्या प्राधिकरण अधिकाऱ्यानेही पाहणी करणे गरजेचे आहे. 15 दिवसांच्या आतमध्ये याबाबतचा अहवाल तयार होणे अपेक्षित आहे. या अहवालानुसारच शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने आगाऊ रक्कम जमा करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्याची मागणी लोकप्रतिनीधींनी केली आहे. या आगाऊ रकमेचा शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.
सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे
सोयाबीन हे खरीप हंगामातील हुकमी पीक आहे. वर्षानुवर्षे सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही वाढ झाली आहे. राज्यात तब्बल 43 लाख हेक्टरावर सोयाबीन असले तरी सर्वाधिक नुकसानही याच पिकाचे झाले आहे. कारण खरिपाचा पेरा होताच राज्यात पावसाला सुरवात झाली होती. पिके उगवल्यापासून पाण्यातच असल्याने वाढ खुंटली आहे. भविष्यात उत्पादनावरही याचा परिणाम होणार आहे. राज्यात आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्येही अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीनचेच अधिक नुकसा झाले आहे.