Washim : पेरणी रखडली अन् सोयाबीनचे दरही घसरले, घटत्या दरावर नेमका परिणाम कशाचा ?

जून महिना अंतिम टप्प्यात असला तरी सर्वत्र पेरणी सुरु झाली असे चित्र नाही. मात्र, झालेल्या पावसाच्या जोरावर खरीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. शेतकरी शेतीकामात व्यस्त असल्याने सध्या सोयाबीनची आवकही कमी झाली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6 हजार 100 रुपये असा दर मिळाला आहे.

Washim : पेरणी रखडली अन् सोयाबीनचे दरही घसरले, घटत्या दरावर नेमका परिणाम कशाचा ?
हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनच्या दरात घसऱण सुरु आहे.
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 12:45 PM

वाशिम : यंदा (Kharif Season) खरिपावर चिंतेचे ढग असतानाच दुसरीकडे (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली घट ही शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. आतापर्यंत अधिकचा दर मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी गेल्या 8 महिन्यापासून साठवणूक केलेल्या सोयाबीनला आता 6 हजार 100 असा दर मिळत आहे. (Central Government) केंद्राने पुढील 2 वर्षाकरिता कच्च्या सोयाबीन आणि कच्च्या सूर्यफूल तेलाची शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिल्यानंतर, सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण सुरू झाली आहे. आता दर 6 हजारापर्यंत असले तरी भविष्यात यामध्ये आणखीन घट होईल असा अंदाज आहे.

शेतीकामाच्या लगबगीमुळे आवकही थंडावली

जून महिना अंतिम टप्प्यात असला तरी सर्वत्र पेरणी सुरु झाली असे चित्र नाही. मात्र, झालेल्या पावसाच्या जोरावर खरीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. शेतकरी शेतीकामात व्यस्त असल्याने सध्या सोयाबीनची आवकही कमी झाली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6 हजार 100 रुपये असा दर मिळाला आहे. घटत्या दराचाही आवकवर परिणाम झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्राच्या निर्णयानंतर पुन्हा दरात घसरण सुरु झाली आहे.

साठवलेल्या सोयाबीनचे करायचे काय ?

हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार हा कायम राहिलेला आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तरी अपेक्षित दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. उलट आता दरात घसरणच सुरु झाली आहे. यंदाच्या हंगामात 7 हजार 500 हा सर्वाधिक दर सोयाबीनला मिळाल्याने अपेक्षा होती सोयाबीन 8 हजार रुपये क्विंटलवर जाईल पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात दराच्या बाबतीत उलटेच होताना पाहवयास मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्राच्या निर्णयाचाही परिणाम

केंद्र सरकारने पुढील दोन वर्षांकरिता कच्च्या सोयाबीन आणि कच्च्या सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण सुरू झाली. सोयाबीनचे दर सहा हजारांच्या खाली आले. दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन साठविणाऱ्या शेतकऱ्यांची दरातील घसरणीमुळे घोर निराशा झाली. शिवाय यंदा खरिपातील पेरण्या लांबल्याने उत्पादनाबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.