सेंद्रीय शेतीतून बंपर उत्पादन, शेतकरी काढतो चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला पण, कसा?

विशेष म्हणजे सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती करून चांगले उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत.

सेंद्रीय शेतीतून बंपर उत्पादन, शेतकरी काढतो चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला पण, कसा?
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 3:06 PM

नवी दिल्ली : बहुतेक शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते, असा काही शेतकऱ्यांचा समज आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यासही चांगले उत्पन्न होऊ शकते. त्यासाठी शेणखताचा वापर करावा लागेल. चांगल्या आरोग्यासाठी लोकं सेंद्रीय शेतीकडे वळत आहे. सेंद्रीय पद्धतीने घेतलेल्या फळ, भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती करून चांगले उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत.

गायीच्या शेण आणि गोमुत्राचा वापर

असेच एक शेतकरी आहेत शिवकुमार. ते उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी आहेत. शिवकुमार गेल्या काही वर्षांपासून गिनौरा नंगली येथे सेंद्रीय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करतात. गाईचे शेण आणि गोमुत्राचा वापर करतात. भाजीपाला विक्रीसोबतच गावातील लोकांना मोफत भाजीपाला देतात.

रासायनिक कीटकनाशकाचा वापर नाही

शिवकुमार यांनी लवकीची शेती केली. ते शेणखत आणि गोमुत्राचा खत म्हणून वापर करतात. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत नाहीत. त्यामुळे त्यांचा भाजीपाला लवकर खराब होत नाही. शिवाय टेस्टही चांगली लागते.

बीज अंकुरल्यानंतर शिंपडतात गोमुत्र

शिवकुमार सांगतात की, गायीचे शेण आणि गोमुत्राचा खत म्हणून वापर केल्यास उत्पादनात वाढ होते. सेंद्रीय शेतीची मागणी जास्त आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यास खर्च कमी होते. कोणतेही रोपं लावण्यापूर्व शेणखत आणि गोमुत्राचा वापर केला जातो. त्यानंतर रोपटे लावतात. बीज अंकुरीत झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी गोमुत्र शिंपडलं जातं. यामुळे रोपावर कीटकाचा परिणाम होत नाही.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.