Washim : आश्वासनांची खैरात, प्रोत्साहन रकमेतून दिलासा नव्हे तर शेतकऱ्यांचे खच्चीकरण
महाविकास अघाडी सरकार सत्तेवर येताच महात्मा ज्याोतिराव फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. त्या दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे अडीच लाखापर्यंतचे कर्ज आहे त्यांचे सरसकट माफ तर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे अशांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही रक्कम वर्ग करण्याचे मागे पडले तर त्यानंतर राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.
वाशिम : (State Government) राज्य सरकारने 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा करुन अडीच वर्षाचा कालावधी लोटला आहे. याच दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी नियमित (Loan Waiver) कर्ज अदा केले होते त्यांना 50 हजार पर्यंतच प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण यानंतर दोन (Budget) अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले पण अजूनही 50 हजार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही रक्कम कशा प्रकारे जमा होणार याची माहिती अधिवेशनादरम्यान दिली होती. मात्र, अंमलबजावणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
कशामुळे रखडली होती प्रोत्साहनपर रक्कम?
महाविकास अघाडी सरकार सत्तेवर येताच महात्मा ज्याोतिराव फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. त्या दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे अडीच लाखापर्यंतचे कर्ज आहे त्यांचे सरसकट माफ तर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे अशांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही रक्कम वर्ग करण्याचे मागे पडले तर त्यानंतर राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. एवढे सर्व होऊन चालू वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही रक्कम कशी आणि केव्हा शेतकऱ्यांना मिळणार याबाबत सर्वकाही सांगून आता 2 महिने कालावधी लोटला असला तरी शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही.
काय म्हणाले होते उपमुख्यमंत्री ?
ठाकरे सरकारने सत्तेची स्थापना करताच कर्जमाफीची घोषणा केली होती. याच दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज अदा केले आहे त्यांना देखील 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोरोना आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली नव्हती. मात्र, आता ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याकरिता 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.
रक्कम मिळणार पण कधी..?
थकबाकीदारांना दिलासा आणि नियमिकत कर्ज अदा करणाऱ्यांच्या पदरी निराशाच असेच काहीशे धोरण राज्य सरकारचे आहे. अर्थसंकल्पातील घोषणेनंतर लागलीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खत्यामध्ये जमा होईल असे चित्र निर्माण केले गेले. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी एक नया पैसाही शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून पैसे मिळणार पण केव्हा असा सवाल वाशिम येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.