कांदा उत्पादक शेतकऱ्याचे भन्नाट आंदोलन, कांद्याला कोंब फुटले पण सरकारला जाग नाही म्हणत काय केलं ?
नाशिकच्या सटाणा येथील किरण मोरे या शेतकऱ्याने कलेचा वापर करीत निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यन्त हा निषेध गेला पाहिजे ही या शेतकऱ्याची अपेक्षा आहे.

नाशिक : कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने भन्नाट आंदोलन केले आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा देखील होऊ लागली आहे. काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे 20 छायाचित्र कांद्यावर रेखाटल्या आहेत. कांद्यावर अत्यानंत कलाकुसरीने केलेले चित्रीकरण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. कांद्याला कोंब फुटले पण कांद्याला भाव नाही असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यन्त पोहचविण्यासाठी शेतकऱ्याने हा खटाटोप केला आहे. शेतकरी कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोख्या पद्धतीने केलेला निषेधाची जोरदार चर्चा होत आहे. कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण न झाल्याने अनोख्या पद्धतीने आंदोलन नाशिकच्या शेतकऱ्याने केले आहे.
कांदा दरात सातत्याने होणारी घसरण शेतकऱ्याची चिंता वाढवणारी बाब ठरत असून कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 20 मुद्रा कांद्यावर चितारल्या आहेत, त्या कांद्याना कोंब फुटले तरी सरकार कांद्याच्या दरात सुधारणा करीत नसल्याची नाराजी व्यक्त करत आहे.




नाशिकच्या सटाणा येथील किरण मोरे या शेतकऱ्याने कलेचा वापर करीत निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यन्त हा निषेध गेला पाहिजे ही या शेतकऱ्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याची होणारी निर्यात, बेमोसमी पाऊस, वातावरणात झालेला बिगाड यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
कांद्याला कोंब फुटले, मात्र सरकारला अजूनही जाग आली नाही या आशयाखाली कलाकार शेतकऱ्याने केलेले अनोखे आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे.