अशक्य असे काहीच नाही, वाढत्या ऊसक्षेत्रावर शेतकऱ्यांचा रामबाण उपाय, शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची जोड

सध्या सबंध राज्यात एकच प्रश्न आहे तो म्हणजे अतिरिक्त ऊसाची तोड. हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी अजून ऊस हा फडातच आहे. यामुळे ऊसाचे गाळप होते की नाही या चिंतेत बळीराजा आहे. मात्र, वाढते क्षेत्र आणि कारखान्यांचे दुर्लक्ष याचा चूणचूण जणू काही धारुर तालुक्यातील शेतकऱ्यांना यापूर्वीच लागली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून घेतल्या जाणाऱ्या ऊस पिकाला त्यांनी हद्दपार करुन थेट डाळिंबाची लागवड केली होती.

अशक्य असे काहीच नाही, वाढत्या ऊसक्षेत्रावर शेतकऱ्यांचा रामबाण उपाय, शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची जोड
बीड जिल्ह्यातील आंबेगाव शिवारात ऊसाला पर्याय म्हणून डाळिंब लागवड करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 2:43 PM

बीड : सध्या सबंध (Maharashtra) राज्यात एकच प्रश्न आहे तो म्हणजे अतिरिक्त ऊसाची तोड. हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी अजून ऊस हा फडातच आहे. यामुळे (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप होते की नाही या चिंतेत बळीराजा आहे. मात्र, वाढते क्षेत्र आणि कारखान्यांचे दुर्लक्ष याचा चूणचूण जणू काही धारुर तालुक्यातील शेतकऱ्यांना यापूर्वीच लागली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून घेतल्या जाणाऱ्या ऊस पिकाला त्यांनी हद्दपार करुन थेट (Pomegranate Garden) डाळिंबाची लागवड केली होती. तालुक्यातील आंबेवडगाव शिवारात कुंडलिका धरणाचे मुबलक पाणी असल्याने ऊसाची शेती वाढली होती. पण दिवसेंदिवस उत्पादनावर होणारा खर्च, वर्षाभराची मेहनत आणि तोडणीच्या प्रसंगी होणारी तारांबळ यामुळे शेत जमिनीचा पोत ओळखून येथील शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड केली होती. त्यामुळे एकीकडे डाळिंब बहरात आहे तर दुसरे शेतकरी ऊसाची तोड केव्हा होणार या विवंचनेत. पीक पध्दतीमध्ये बदल करण्यासाठी शेतकरी सुधारकर पुंडे यांनी केलेले मार्गदर्शन आज या आंबेगावच्या शेतकऱ्यांना उपयोगी पडलेले आहे.

यामुळे वाढले होते ऊसाचे क्षेत्र

ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक समजले जाते. पाण्याची सोय झाली लागवड क्षेत्र वाढणारच. अगदी त्याप्रमाणेच धारुर तालुक्यात कुंडलिका धरणातील पाण्याचा साठा ऊसाचे क्षेत्र वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेला होता. गेल्या 25 वर्षापासून या धरणालगतच्या भागाच ऊसाची लागवड केली जात होती. शिवाय वर्षागणीस क्षेत्र हे वाढत होते. मात्र, आंबेगावच्या 15 ते 20 शेतकऱ्यांनी केलेला पीक पध्दतीमधील बदल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. एकाच पिकामुळे शेत जमिनीचा सामूही कमी होऊन उत्पादनात घट होत आहे. शिवाय वेळत तोड न झाल्याने होणारे नुकसान हे वेगळेच त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.

ऊसाला पर्याय डाळिंबाचा

धारुर तालुक्यातील शिवार तसा बागायती आणि मुरमाड अशाच प्रकारचा आहे. जमिनीचा अभ्यास उपलब्ध पाणीसाठ आणि बाजारपेठेतील मागणी या सर्व बाबींचा अभ्यास करुन आंबेवडगाव येथील शेतकरी सुधाकर मुंडे यांनी डाळिंब शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली डाळिंबासाठीही मुरमाड जमिनीच योग्य आहे शिवाय पाणीही उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनाही हे पटले आणि त्यांनी केलेल्या पीक पध्दतील बदलाचे महत्व यंदा रखडलेल्या ऊसतोडीमुळे अधिकच फायदेशीर ठरले आहे. त्यामुळे केवळ नगदी पीक म्हणून लागवड करण्यापेक्षा भविष्याचा वेध घेऊन केलेला बदल किती फायदेशीर आहे यावरुनच लक्षात येते.

आंबेवडगाव शिवारात बहरल्या डाळिंब बागा

पीक पध्दतीमध्ये बदल तर शक्य आहे पण घेतलेला निर्णय यशस्वी करुन दाखवणे तेवढेच कठीण. मात्र, सुधाकर मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन औषध फवारणीपासून ते पाण्याचे नियोजन इथपर्यंतचे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी आंबे बहर धरलेला आहे. रासायनिक खताबरोबर तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आता बागांची सेटींग सहज जमू लागलेली आहे. सध्या तरी आंबेवडगाव शिवारात डाळिंबाच्या बागा बहरत आहेत. वातावरणातील बदलाचे काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Cotton : कापूस दरवाढीला ‘ब्रेक’, आता साठवणूक की विक्री..! शेतकऱ्यांनी नेमके करावे काय ?

कलिंगड उत्पादकांसाठी ‘अच्छे दिन’, दोन वर्ष नुकसानीचे, यंदा दोन महिन्यांमध्ये शेतकरी मालामाल

पीकविम्याची झळ ग्रामपंचायतीपर्यंत, बीडमधील 100 ग्रामपंचयातीसमोर शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.