सेंद्रीय भाजीपाल्याची चव लई न्यारी, विषमुक्त अन्नाला ग्राहकांचे प्राधान्य
उन्हामुळे पाण्याचा स्तर खाली गेला आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न घेण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. भाजीपाला पिकं वाळत आहेत.
नवी दिल्ली : हिरवा भाजीपाला खाणे सर्वांची पसंती असते. यासाठी काही लोकं खूप खर्च करतात. तरीही लोकांना विषमुक्त भाजीपाला मिळत नाही. कारण बहुतेक शेतकरी जास्त उत्पादन व्हावे म्हणून रासायनिक शेती करतात. शेणाच्या ऐवजी शेतात रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर करतात. यामुळे हिरव्या भाजीपाल्याच्या टेस्टवर परिणाम पडतो. परंतु, देशात काही शेतकरी आहेत की जे सेंद्रीय शेती करतात. त्यांच्याकडून उगवण्यात आलेला भाजीपाला हातोहात बाराजात खपतो. आता आपण बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची माहिती जाणून घेणार आहोत. कारण यांनी सेंद्रीय शेती करून आदर्श निर्माण केला.
उन्हाचा उत्पादनावर परिणाम
न्यूज १८ हिंदीच्या रिपोर्टनुसार, सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव मोहम्मद वसीम आहे. ते दरभंगा जिल्ह्यातील सीमइसीपूर गावात सेंद्रीय शेती करतात. शेतात पिकवलेला भाजीपाला बाजारात विकतात. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. परंतु, उन्ह आणि लूमुळे भाजीपाला पिकावर वाईट परिणाम होतो. यामुळे उत्पन्नावर फरक पडतो.
पाण्याचा स्तर खाली गेला
मोहम्मद वसीम सांगतात की, उन्हामुळे पाण्याचा स्तर खाली गेला आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न घेण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. भाजीपाला पिकं वाळत आहेत. दूरवरून पाणी आणून सिंचन करावे लागत आहे. याशिवाय रासायनिक शेतीला पाणी जास्त लागते. त्यामुळे जलस्तर खाली गेला आहे.
२५ रुपये किलो विकतात भाजीपाला
मोहम्मद वसीम यांच्या शेतात कारले लावलेले आहेत. यासह अन्य भाजीपालाही होतो. हिरव्या भाजीपाल्याचे ते उत्पादन घेतात. परंतु, उन्हाळ्यात उन्हामुळे उत्पादनात घट होते. कारले सध्या २० ते २५ रुपये प्रती किलो विक्री करत आहेत. इतर भाजीपालाही महागला आहे. कारण उन्हामुळे उत्पादनात घट झाली आहे.
मोहम्मद वसीम यांनी सेंद्रीय शेतीची कास धरली. त्यामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे. विषमुक्त अन्न ते स्वतः खातात आणि ग्राहकांनाही देतात. यामुळे ते आनंदी आहेत. सेंद्रीय शेतातील माल असल्याने ग्राहक या भाजीपाल्यावर तुटून पडतात. बाजारात त्यांचा भाजीपाला हातोहात विकतो.