Start Up : शेतकऱ्याच्या मुलाने लावला स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध, 15 राज्यांमध्ये विस्तार अन् लाखोंची कमाई

कोणत्याही गोष्टीची गरज निर्माण झाली की ती उपलब्धही होते. मात्र, त्यासाठी आवश्यकता आहे जिद्द अन् परीश्रमाची. काळाच्या ओघात कृषी क्षेत्रामध्ये यात्रिकिकरण वाढेलेले आहे. याकरिता राज्य आणि केंद्र सरकार कोट्यावधींची गुंतवणूक करीत आहे. पण सध्या एकच चर्चा आहे ती मराठवाड्यातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाने लावलेल्या स्वयंचलित फवारणी यंत्राची.

Start Up : शेतकऱ्याच्या मुलाने लावला स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध, 15 राज्यांमध्ये विस्तार अन् लाखोंची कमाई
औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथील योगेश गावंडे याने फवारणी यंत्राचा शोध लावला आहे. यामुळे वेळेची बचत आणि विषबाधेचा धोका होत नाही.
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 7:30 AM

औरंगाबाद : कोणत्याही गोष्टीची गरज निर्माण झाली की ती उपलब्धही होते. मात्र, त्यासाठी आवश्यकता आहे जिद्द अन् परीश्रमाची. काळाच्या ओघात कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकिकरण वाढेलेले आहे. याकरिता राज्य आणि (Central Government) केंद्र सरकार कोट्यावधींची गुंतवणूक करीत आहे. पण सध्या एकच चर्चा आहे ती (Marathwada) मराठवाड्यातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाने लावलेल्या स्वयंचलित (Spraying Machine) फवारणी यंत्राची. औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथील योगेश गावंडे याने यंत्राचा शोध लावला असून गेल्या 4 वर्षामध्ये त्याने 400 हून अधिक मशीन बनवल्या असून 15 राज्यांमध्ये त्या पाठलेल्या आहेत. त्याने निओ स्प्रे पंप हे सुरवातीला महाविद्यालयातील एका प्रोजेक्टसाठी बनविण्यात आले होते. आता त्याची मागणी वाढत आहे. वेळेची बचत आणि विषबाधेचा धोका नाही हे या यंत्राचे फायदे आहेत.

अशी झाली सुरवात

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणाचे ध़डे घेत असताना योगेश गावंडे यांनी एका कॉलेजच्या एका प्रोजेक्टमध्ये हे यंत्र साकारले होते. यासाठी त्यांना केवळ 3 हजार 800 रुपये खर्च आला होता. स्वयंचलित फवारणी यंत्राचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी या प्रायोगिकतत्वार केलेल्या प्रकल्पाला उद्योगाचे स्वरुप देण्याचे ठरवले. त्यांनी चिखलठाण्यातच शेड उभारुन कॉलेजच्या 4 वर्षात 400 स्वयंचलित फवारणी यंत्र बनवले व यामधून तब्बल 20 लाखांची उलाढाल केली होती. एवढ्यावरच न थांबता योगेश यांनी एका कंपनीमध्ये मार्केटींगचे धडे घेतले आहेत. त्यामुळे आता यंत्राची निर्मिती आणि आता बाजारपेठ या दोन्ही बाबी त्यांना अवगत झाल्या आहेत.

स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून अशी होते फवारणी

वाहनांमधील आय़सी इंजिनमध्ये पिस्टन रेसिप्रोकेट होते. वाहनाला चेन असल्यामुलळे दोन्ही चाके ही फिरतात. यामध्ये उलटी प्रक्रिया आहे. चाक असणाऱ्या एका लोखंडी स्टॅंडवर खताची पिशवी लटकवता येते. यंत्र सुरु झाले की यंत्रावरील दांडा खाली-वर करण्याची प्रक्रिया सुरु होते. आणि नोझलमधून खत फवारणी केली जाते. या फवारणी यंत्राला निओ स्प्रे पंप असे नावही त्यांनी दिले आहे. यामधून 5 जणांना रोजगार मिळाला असल्याचे योगेश गावंडे यांनी सांगितले आहे.

तरुणांकडील कल्पकतेला वाव मिळायला हवा

शहरी आणि ग्रामीण भाग याचा कोणताही फरक विद्यार्थ्यांच्या कल्पकतेवर पडत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडेही कल्पकता मोठ्या प्रमाणात असते मात्र, त्यांच्या स्वभावामुळेच त्याला पाहिजे तसा वाव मिळत नाही. तरुणांनी कोणत्याही गोष्टीचा कमीपणा न बाळगता आपले ज्ञान इतरांसमोर मांडणे गरजेचे आहे. तरच त्याचे चीज होणार आहे. शिवाय मनात आलेल्या कल्पनांना व्यासपीठ मिळवू द्या त्याचा आनंद काही वेगळाच असल्याचे योगेश गावंडे यांनी tv9 मराठी डिजीटल शी बोलताना सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season: उत्पादनात घट मात्र, वाढत्या दराने खरिपातील तीन पिकांचा मिळतोय शेतकऱ्यांना ‘आधार’

रब्बी हंगामातील पिकांची काळजी अन् कांदा लागवडीबाबत कृषी तज्ञांचा काय आहे सल्ला?

farmer producer company: आता शेतकरी उत्पादक कंपन्याही करणार तूरीची खरेदी, नेमका फायदा काय?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.