प्रश्न एका संरक्षण भितींचा नुकसान मात्र कोट्यावधीचे, काय आहेत नांदूरमेश्वर धरणालगतच्या शेतकऱ्यांच्या समस्या?
एकीकडे पाण्याविना पिकांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे धरणाचे पाणी थेट शेतामध्ये घुसत असल्याने शेतजमिनच नापिक होत आहे. शेतकऱ्यांसमोर कधी अस्मानी संकट तर कधी सुल्तानी संकट हे ठरलेलेच आहे. आता गेल्या 8 ते 9 वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील नांदूरमेश्वर धरणातील पाण्यामुळे तब्बल 250 हेक्टर शेतजमिन ही बाधित झालेली आहे.
लासलगाव: एकीकडे पाण्याविना पिकांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे धरणाचे पाणी थेट शेतामध्ये घुसत असल्याने (Farm Land) शेतजमिनच नापिक होत आहे. शेतकऱ्यांसमोर कधी अस्मानी संकट तर कधी सुल्तानी संकट हे ठरलेलेच आहे. आता गेल्या 8 ते 9 वर्षापासून (Nashik District) नाशिक जिल्ह्यातील नांदूरमेश्वर धरणातील पाण्यामुळे तब्बल 250 हेक्टर शेतजमिन ही बाधित झालेली आहे. भर उन्हळ्यामध्ये देखील या शेतजमिनीमध्ये (Production) उत्पादन घेता येत नाही. यासंबंधी शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन, मोर्चे काढून आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या मात्र, अद्यापही काही तोडगा निघाला नसल्याने जैसे थे अशीच स्थिती यंदाही आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा, ऊस, गहू अशा कोणतेच पीक घेता येत नाही. प्रशासनाने एक भराव बांधून दिला तर शेकडो शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट
उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. सध्याच्या निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. उत्पादनात वाढ हा सरकारचा हेतू असला तरी उत्पादन घटन्यामागे हीच प्रशासकीय यंत्रणा आहे का असाच सवाल नांदूरमेश्वर धरणालगतच्या शेतकऱ्यांकडे पाहिल्यावर निर्माण होत आहे. शेतजिमनीचा योग्य वापर करता येत नाही. शिवाय बाराही महिने या शेत जमिनीवर पाणी साचल्याने पीकच घेता नाही अशी स्थिती आहे. अन्यथा धरण क्षेत्रामध्ये कांदा,ऊस, गहू या पिकाचे अधिकचे उत्पादन घेतले जात पण सततच्या पाण्यामुळे मशागतीची कामेही करणे मुश्किल होत आहे.
9 वर्षापासून केवळ आश्वासनांची खैरात
नांदूरमेश्वर धरणातील पाण्यामुळे लगतचे क्षेत्र बाधित होत असून हे काही आजची समस्या नाही. गेल्या 9 वर्षापासून अशीच स्थिती आहे. शेतकऱ्यांना चांगल्या जमिन क्षेत्राचा वापरही करता येत नाही. भर उन्हाळ्यातही अशी अवस्था तर पावसाळ्यात हे क्षेत्र चिभडलेच जाते. त्यामुळे जमिनीचा सामू कमी होत आहे. भविष्यात याचा वापर होऊ लागला तरी उत्पादनात घट ही राहणारच. पण प्रशासनाकडून कोणतिही उपाययोजना केली जात नाही हे विशेष.
जिल्हाधिकाऱ्यांचे पुन्हा शेतकऱ्यांना आश्वासन
धरणातील पाणी शेत जमिनीमध्ये घुसल्याने काय स्थिती ओढावली आहे याचा पाढाच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासमोर वाचला. शिवाय हे क्षेत्र थोडे नसून होणारे नुकसान पाहता उपाययोजना राबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणी काही संरक्षण भिंत व अन्य काही उपाययोजना करता येतील का या संदर्भात नक्कीच तोडगा काढला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
कृषीपंपाचा वीजप्रश्न पेटला : कोल्हापुरात राजू शेट्टींचे बेमुदत तर मोहळमध्ये कुणाचे आमरण उपोषण?
उशिराचे शहाणपण : हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाणी पुरवठा करण्याचा पाटबंधारे विभागाचा ‘घाट’
ऊसतोड रखडल्याने शेतकऱ्यांनी शोधला ‘हा’ मधला मार्ग, मागणीही अन् वाढता दरही