Pomegranate : उभ्या डाळिंब बागेवर फिरवला नांगर, पाऊस होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम..!

बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट उत्पादनावर होऊ लागला आहे. यापूर्वी पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार होता तो फळबागांचा. शिवाय पावसामध्येही फळबागा जोपासण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. मात्र, आता पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणातील बदलामुळे डाळींबावर कीड आणि रोगराईचा प्रादुर्भाव हा सुरुच होता. उत्पादनापेक्षा बागा जोपासण्यावरच अधिकचे पैसे खर्ची होत असल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.

Pomegranate : उभ्या डाळिंब बागेवर फिरवला नांगर, पाऊस होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम..!
तेल्या रोगामुळे डाळिंबाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांने बाग मोडली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 4:39 PM

लासलगाव : (Climate Change) बदलत्या वातावरणाचा परिणाम केवळ (Kharif Crop) हंगामातील पिकांवरच झाला असे नाहीतर यामधून फळबागांचीही सुटका झालेली नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाबरोबर आता (Pomegranate garden) डाळिंब बागांचेही क्षेत्र वाढत आहे. पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न केला तरी निसर्गाच्या लहरीपणासमोर शेतकरी हा हताश झाला आहे. उत्पादनात होणारी घट ही कशीही भरुन काढली जात होती पण दरवर्षी उत्पादनापेक्षा नुकसानच अधिक होत असल्याने येवला तालुक्यातील एरंडगाव येथील सतीश ठोंबरे या शेतकऱ्याने 5 एकरातील डाळिंब बाग अक्षरश: नांगरुन टाकली आहे. नुकसान होण्यापेक्षा क्षेत्र रिकामे राहिले तरी चालेल असे म्हणत ठोंबरे यांनी हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत द्राक्ष उत्पादक हे अडचणीत होते पण आता डाळिंब बागायतदारही त्रस्त झाले आहेत.

रोगराईमुळे बागाचे नुकासन

बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट उत्पादनावर होऊ लागला आहे. यापूर्वी पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार होता तो फळबागांचा. शिवाय पावसामध्येही फळबागा जोपासण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. मात्र, आता पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणातील बदबदलत्या वातावरणाचा परिणाम थेट उत्पादनावर होऊ लागला आहे. यापूर्वी पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार होता तो फळबागांचा. शिवाय पावसामध्येही फळबागा जोपासण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. मात्र, आता पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणातील बदलामुळे डाळींबावर कीड आणि रोगराईचा प्रादुर्भाव हा सुरुच होता. उत्पादनापेक्षा बागा जोपासण्यावरच अधिकचे पैसे खर्ची होत असल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. लामुळे डाळींबावर कीड आणि रोगराईचा प्रादुर्भाव हा सुरुच होता. उत्पादनापेक्षा बागा जोपासण्यावरच अधिकचे पैसे खर्ची होत असल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. तेल्या रोगामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्याने हा निर्णय घेऊन 5 एकर क्षेत्र रिकामे केले आहे.

तेल्या रोगाचा प्रादुर्भाव

वातावरणातील बदलामुळे डाळिंब फळबागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे गतवर्षीचे नुकसान यंदा भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पण आता पावसाने उघडीप देताच तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगराई व नैसर्गिक आपत्तीचा फटका या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला बसला आहे. त्यामुळेच त्यांनी अधिकचे नुकसान करुन घेण्यापेक्षा बागच मोडली आहे.

हे सुद्धा वाचा

सभागृहात होणार प्रत्यक्ष मदत रक्कम वाटपाची घोषणा

गेल्या अनेक दीड महिन्यापासून राज्यात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण फळबागाही आडव्याच आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीक करावा या मागणीसाठी विरोधक हे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. घोषणा झाली पण प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा होणार असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत सोमवारी घोषणा केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमकी कधी रक्कम जमा होणार याबाबत सांगितले जाणार असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.