Pik Vima : रब्बी हंगाम मध्यावर तरी शेतकऱ्यांना प्रतीक्षा खरिपातील पीक विम्याचीच, बीडमध्ये निदर्शने

दिवसेंदिवस पीक विमा योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वासच बसत नाही. त्यामुळे यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्याही घटत आहे. नेमके असे कशामुळे होत आहे तर विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे. आता रब्बी हंगाम मध्यावर आहे. शिवाय या पिकाच्या अनुशंगाने योजनेत सहभागी होण्याची मुदतही संपलेली आहे. असे असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना अद्यापही खरीप हंगामातील पिकांच्याच विमा रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Pik Vima : रब्बी हंगाम मध्यावर तरी शेतकऱ्यांना प्रतीक्षा खरिपातील पीक विम्याचीच, बीडमध्ये निदर्शने
खरीप हंगामातील पिकांचा विमा अद्यापही खात्यावर जमा न झाल्याने बीड येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 3:18 PM

बीड : दिवसेंदिवस (Crop insurance) पीक विमा योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वासच बसत नाही. त्यामुळे यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्याही घटत आहे. नेमके असे कशामुळे होत आहे तर विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे. आता रब्बी हंगाम मध्यावर आहे. शिवाय या पिकाच्या अनुशंगाने योजनेत सहभागी होण्याची मुदतही संपलेली आहे. असे असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना अद्यापही (kharif season,) खरीप हंगामातील पिकांच्याच विमा रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकट्या बीड तालुक्यातील 5 हजार शेतकरी हे विमा रकमेपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने केली. एवढेच नाही गतवर्षीची देखील विमा रक्कम ही कंपन्याकडेच थकीत आहे.

विमा कंपन्याचा मनमानी कारभार सुरुच

ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बीड जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस पडला होता. या पावसात खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांनी पीकविमा भरला होता. नुकसान होवूनही शेतकर्‍यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. एकट्या बीड तालुक्यातील शेतकरी विम्यापासून वंचित राहिले असून विमा कंपनीने सर्व शेतकर्‍यांना विम्याची घोषणा करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही शेतकर्‍यांनी तीव्र निदर्शने करून विमा कंपनीचा निषेध केला. यावेळी धनंजय गुंदेकरसह आदि शेतकरी उपस्थित होते. शेतकर्‍यांनी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

तक्रारीचे अर्ज धुळखात पडून

पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना कृषी कार्यालय, संबंधित विमा कंपनी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय येथे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी तक्रारी अर्ज दाखल केले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात तर गेल्या 19 दिवसांमध्ये 9 हजार 352 तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, एकावरही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे अर्ज करुनही कारवाई होत नसल्यानेच बीड येथे शेतकऱ्यांनी निदर्शने केली. जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा आढावा घेऊन त्वरीत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

काय आहे बीड जिल्ह्यातील विमा परताव्याची अवस्था

बीड जिल्ह्यातील जवळपास तीस हजार शेतकरी आज तागायत पिक विम्या पासून वंचित आहेत. त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपल्या हक्काच्या विम्यासाठी निदर्शने केलीयेत. एकट्या बीड तालुक्यातील 5 हजार शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळालेला नाही. तर 2020 मध्ये अतिवृष्टी होऊन देखील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांना विमा मंजूर न झाल्यास गाव पातळीवर सर्वच शेतकऱ्यांकडून उपोषण केले जाईल, असा इशारा यावेळी दिला गेला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांची मंदीत संधी, लॉकडाउनच्या काळातही शेती व्यवसयात कोट्यावधींची गुंतवणूक..!

आता निर्णायक टप्पा, सोयबीन ठेवायचे की विकायचे ! बाजारपेठेतले वास्तव काय ?

KISAN CREDIT CARD : केंद्र सरकारच्या योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग, असे मिळवा किसान क्रेडीट कार्ड

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.