Grape : कृषी विभागामुळे द्राक्ष निर्यातीची नोंदणी वाढली पण निसर्गाने सर्व डावच मोडला, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे चित्र?

दरवर्षी द्राक्षाचे वाढते उत्पादन आणि त्यामधून शेतकऱ्यांना होणारा आर्थिक फायदा पाहता कृषी विभागानेही महत्वाची भूमिका घेण्याचा निर्धार केला होता. शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे या हेतूने द्राक्ष निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीची मोहिमच या विभागाने सुरु केली होती. गाव पातळीवर जाऊन जनजागृती आणि निर्यातीचे फायदे सांगून शेतकऱ्यांना कसा अधिकचा लाभ होईल यावर लक्ष केंद्रीत केले होते. यामुळे नोंदणी वाढली मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली.

Grape : कृषी विभागामुळे द्राक्ष निर्यातीची नोंदणी वाढली पण निसर्गाने सर्व डावच मोडला, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे चित्र?
निसर्गाच्या लहरीपणाुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे. परिणामी निर्यातही घटली आहे. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 2:17 PM

सांगली : दरवर्षी द्राक्षाचे वाढते उत्पादन आणि त्यामधून शेतकऱ्यांना होणारा आर्थिक फायदा पाहता (Agricultural Department) कृषी विभागानेही महत्वाची भूमिका घेण्याचा निर्धार केला होता. शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे या हेतूने (Grape Export) द्राक्ष निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या (Registration of exports) शेतकऱ्यांच्या नोंदणीची मोहिमच या विभागाने सुरु केली होती. गाव पातळीवर जाऊन जनजागृती आणि निर्यातीचे फायदे सांगून शेतकऱ्यांना कसा अधिकचा लाभ होईल यावर लक्ष केंद्रीत केले होते. यामुळे नोंदणी वाढली मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली. घटत्या उत्पादनामुळे गतर्षीच्या तुलनेत नोंदणी अधिक पण निर्यात कमी असे चित्र निर्माण झाले आहे. सांगली जिल्ह्यातून यंदाच्या हंगामात केवळ 11 हजार 569 टन द्राक्षाची निर्यात करण्यात आली आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाचे हे चित्र आहे.

नोंदणी अधिक अन् निर्यात कमी

द्राक्ष निर्यात होण्यापूर्वी त्याची नोंदणी कृषी विभागाकडे करणे महत्वाचे असते. शिवाय दरवर्षी निर्यात वाढत असल्याने या निर्यातीचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यास होण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती मोहिम सुरु केली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तर वाढली मात्र, त्या प्रमाणात निर्यात झालेली नाही. यंदा सांगली जिल्ह्यातून 5 हजार 808 शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर गतवर्षी 4 हजार 283 शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. नोंदणी कमी असतानाही गतवर्षी 19 हजार 492 टन द्राक्षाची निर्यात झाली होती तर यंदा केवळ 11 हजार 569 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.

अतिवृष्टी अन् अनियमित पावसाचा परिणाम

कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी वाढली तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे कृषी विभागाची मेहनत आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनियमित पावसाचा सर्वाधिक फटका आंबा आणि द्राक्ष बागांना यंदा बसलेला आहे. डिसेंबर महिन्यापासून हंगामाला सुरवात होताच दुसरीकडे अवकाळी पावसालाही सुरवात झाली होती. त्यामुळे द्राक्षाचा दर्जा तर ढासळलाच पण उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि कृषी विभागाने प्रयत्न करुनही यंदा निर्यातीवर परिणाम होणार आहे. कारण निर्यातीसाठी नोंदणी बरोबरच मालाचा दर्जाही चांगला असणे गरजेचे आहे.

नोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया

हंगाम सुरु होताच शेतकऱ्यांना द्राक्षाची निर्यात करता यावी म्हणून त्याची नोंदणी ही कृषी विभागाकडे केली जाते. नव्याने निर्यात करणाऱ्यांबरोबर ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे त्यांना त्यांचे परवाने नूतनीकरण करुन घ्यावे लागतात. ही सर्व प्रक्रिया कृषी विभागात केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना फायदा आणि कृषी विभागाचे योगदान अशा दोन्ही बाबींचा विचार होतो. यंदा हंगाम सुरु झाल्यापासून सांगली कृशी विभागाने 5 हजार 808 अशा शेतकऱ्यांची नोंदणी केली होती ज्यांना द्राक्ष निर्यात करायची आहे.

संबंधित बातम्या :

Onion Crop : ‘भीम शक्ती’ने पाच एकरात चौपट उत्पन्न मिळणार, कांदा बियाणे ठरले टर्निंग पॉईंट..!

Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या

Toor Crop : केंद्र सरकारचे धोरण अन् शेतकऱ्यांचे मरण, ज्याची भीती शेतकऱ्यांना तोच निर्णय सरकारचा..!

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.