Seed production : शेतकऱ्यांनो महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग नोंदवा अन् उत्पादन वाढवा,कशी असते नेमकी प्रक्रिया ?

बिजोत्पादन कार्यक्रमासाठी एका गावात कमीत कमी सर्व पीक वाण मिळून 25 एकर क्षेत्र होणे आवश्यक आहे. महाबीजचे बियाणे खरेदी धोरण व इतर अटी मान्य असलेल्या बिजोत्पादकांना बिजोत्पादन कार्यक्रम घेता येणार आहे. तसेच बिजोत्पादक कार्यक्रम आंवटीत करण्याचा आधिकार महाबीजकडे राखीव ठेवण्यात आला आहे.

Seed production : शेतकऱ्यांनो महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग नोंदवा अन् उत्पादन वाढवा,कशी असते नेमकी प्रक्रिया ?
सोयाबीन बीजोत्पादन
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 4:07 PM

लातूर : यंदा पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामतील पेरणी लांबणीवर गेले असली तरी महाबीजने आपला (Seed Production) बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. यंदा जिल्ह्यात सोयाबीन, उडीद आणि जूट यासाठी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. आतापासूनच याची नोंदणी केली तर महाबीज हे बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करु शकणार आहे. यंदा (Mahabeej) महाबीजच्या सोयाबीन बियाणे दरात वाढ झाली आहे. मात्र, बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यासाठी एका गाव शिवारात किमान 25 हेक्टरावर बियाणांचे उत्पादन घेतले जाणे गरजेचे आहे. तरच महाबीज बियाणे निर्मितीचा उपक्रम राबवते. असे असले तरी प्रथम सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे.

बीजोत्पादनासाठी कसा करायचा अर्ज?

बिजोत्पादक कार्यक्रम घेण्यासाठी तीन महिन्याचा आतील सातबारा, 8 अ चा उतारा,आधार कार्डाची झेरॉक्स, आधार कार्ड लिंक असलेल्या बँक पासबुक IFSC CODE असलेली झेरॉक्स प्रत जोडून मागणी अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी बिजोत्पादन शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय तसेच जिल्हा कार्यालय महाबीज येथे अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 100 नोंदणी फी भरावी लागते.

काय आहेत नियम-अटी?

बिजोत्पादन कार्यक्रमासाठी एका गावात कमीत कमी सर्व पीक वाण मिळून 25 एकर क्षेत्र होणे आवश्यक आहे. महाबीजचे बियाणे खरेदी धोरण व इतर अटी मान्य असलेल्या बिजोत्पादकांना बिजोत्पादन कार्यक्रम घेता येणार आहे. तसेच बिजोत्पादक कार्यक्रम निश्चित करण्याचा आधिकार महाबीजकडे राखीव ठेवण्यात आला आहे. एका बिजोत्पादकास एकाच पिकाचे एकाच वाणाचाच बिजोत्पादन कार्यक्रम घेता येईल.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

महाबीजने ठरवून दिलेल्या प्रमाणित बियाणांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक रक्कम दिली जात होती. मात्र, जिल्ह्यात त्या बियाणाचे दर काय आहेत त्यावरुनच दर निश्चित केले जात होते. महाबीजने आता राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील दरांचा आढावा घेऊन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी होणार नाही. त्यामुळे महाबीजबरोबर शेतकऱ्यांना बियाणांच्या माध्यमातून उत्पादन मिळणार आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.