KCC : एक पानाचा फॉर्म, तीन कागदपत्र अन् तीन लाखाचे कर्ज, कसा घ्यावयाचा किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ?

केसीसी मार्फत कर्ज पाहिजे असा शेतकऱ्यांना बॅंकेत अर्ज करावा लागणार आहे. या अर्जाबरोबर केवळ ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि केसीसी कार्डची झेरॉक्स जमा करावे लागणार आहे. तर पासपोर्ट साईजचे दोन फोटोही द्यावे लागणार आहेत. कागदपत्रांबरोबर संबंधित शेतकऱ्याकडे अन्य कोणत्याही बॅंकेचे कर्ज नाही याचा अहवाल द्यावा लागणार आहे. याकरिता शेतकऱ्यास बॅंकेत जाण्याचीही आवश्यकता नाही.

KCC : एक पानाचा फॉर्म, तीन कागदपत्र अन् तीन लाखाचे कर्ज, कसा घ्यावयाचा किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ?
KCC Card
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 4:20 PM

मुंबई : कागदपत्रांची पूर्तता आणि नियम अटी यामुळे (Farmer) शेतकरी कर्जाकडे पाठ फिरवतात. शेतकऱ्यांच्या याच अडचणी ओळखून (Central Government) केंद्राने किसान क्रेडिट कार्ड अर्थात (KCC) ही योजना. कागदपत्रांची अट नाही आणि कमी व्याजदरात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. शिवाय जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी ही प्रक्रिया सोपी असणार आहे.कारण अशा शेतकऱ्यांचा लेखाजोखा हा बॅंकामध्ये पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे केसीसीच्या माध्यमातून कर्ज मिळवायचे असेल तर शेतकऱ्यास आता एक पानाचा फॉर्म, तीन कागदपत्रांच्या बदल्यात 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. शिवाय दोन आठवड्यात जर कर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली नाहीतर शेतकरी हे बॅंक अधिकाऱ्याबद्दल तक्रार नोंदवू शकणार आहेत.

नेमकी कर्जाची प्रक्रिया कशीआहे?

केसीसी मार्फत कर्ज पाहिजे असा शेतकऱ्यांना बॅंकेत अर्ज करावा लागणार आहे. या अर्जाबरोबर केवळ ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि केसीसी कार्डची झेरॉक्स जमा करावे लागणार आहे. तर पासपोर्ट साईजचे दोन फोटोही द्यावे लागणार आहेत. कागदपत्रांबरोबर संबंधित शेतकऱ्याकडे अन्य कोणत्याही बॅंकेचे कर्ज नाही याचा अहवाल द्यावा लागणार आहे. याकरिता शेतकऱ्यास बॅंकेत जाण्याचीही आवश्यकता नाही. कारण गावागावात कॅम्पचे आयोजन केले जात आहे. शेती, पशुपालन आणि मत्स्यशेतीशी संबंधित कोणीही केसीसीचा लाभ घेऊ शकतो. सामूहिक शेती, पट्टेदार, भागधारक आणि स्वयंसहाय्यता गटही याचा लाभ घेऊ शकतात.

किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावयाचा झाल्यास शेतकऱ्यांना ओळखपत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट यापैकी एकाची प्रत द्यावी लागणार आहे. तर पत्ता म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड यापैकी एक द्यावे लागणार आहे. लाभार्थी हा शेतकरीच आहे यासाठी सातबारा उतारा, 8 अ याच्या प्रतिही जमा कराव्या लागणार आहेत. शिवाय जर शेतकरी हा दुसऱ्या बॅंकेचा कर्जदार नसायला पाहिजे.तसे प्रतिज्ञा पत्र त्याला द्यावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

व्याजदराची कशी आहे प्रक्रिया?

शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे असलेला म्हणजे व्याजदर. शेतकऱ्यांना केसीसीच्या माध्यमातून तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी शेत जमीन गहाण ठेवावी लागणार आहे. तर 1 लाख 60 हजारपर्यंत कर्ज घेतले तर याची आवश्यकता भासणार नाही. तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी 9 टक्के व्याजदर राहणार आहे. आणि जर लाभार्थ्याने वेळेत पैसे अदा केले तर मात्र त्यामध्ये 3 टक्के सूट मिळणार शिवाय सरकारचे 2 टक्के म्हणजे तुम्हाला केवळ 4 टक्के व्याजाने पैस मिळणार आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.