PM Kisan Yojna : 11 वा हप्ता वेळेत होणार जमा, योजनेच्या लाभासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरु

सध्या शेतशिवारात रब्बी हंगामाची लगबग सुरु असली तरी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याचेही वेध लागलेले आहेत. यंदा वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने या योजनेचा 10 हप्ता 10 कोटी 99 लाख 68 हजार 686 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. असे असले तरी या हप्त्याला 1 महिन्याचा उशिर झाला होता. पण 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना अधिकची वाट पहावी लागणार नाही. कारण 11 वा हप्ता जमा करण्याची तयारी सुरु झाली आहे.

PM Kisan Yojna : 11 वा हप्ता वेळेत होणार जमा, योजनेच्या लाभासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरु
पीएम किसान योजना
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 3:32 PM

मुंबई : सध्या शेतशिवारात रब्बी हंगामाची लगबग सुरु असली तरी शेतकऱ्यांना (PM Kisan Yojna) पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याचेही वेध लागलेले आहेत. यंदा वर्षाच्या पहिल्याच दिवशी (Central Government) केंद्र सरकारने या योजनेचा 10 हप्ता 10 कोटी 99 लाख 68 हजार 686 (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. असे असले तरी या हप्त्याला 1 महिन्याचा उशिर झाला होता. पण 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना अधिकची वाट पहावी लागणार नाही. कारण 11 वा हप्ता जमा करण्याची तयारी सुरु झाली आहे. सध्या पीक काढणीची गडबड आणि आगामी खरिपात शेतकऱ्यांची गरज ओळखून 15 एप्रिलपर्यंत या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. याकरिता 20 हजार कोटी खात्यावर वर्ग केले जाणार आहेत तर योजनेचा आतापर्यंतचा खर्च हा 2 लाख कोटींच्या घऱात जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खत्यात थेट पैसे जमा करणारी ही पहिलीच योजना आहे. शिवाय कोणता मध्यस्ती नाही, कोणते कमिशन नाही अशा पध्दतीने ही योजना देशात सुरु आहे. अन्यथा यापूर्वी भ्रष्ट नेते आणि शासकीय कर्मचारी हेच योजनेची वाट लावत होते. यावर आता अंकूश आला असून अत्यंत अल्पभुधारक शेतकऱ्यास देखील योजनेचा लाभ मिळत आहे.

नव्याने होता येणार योजनेमध्ये सहभागी

अनेक शेतकरी हे विविध कारणांमुळे अद्यापही योजनेपासून दूर आहेत. तर बोगस असे योजनेचा लाभ घेत आहेत. याची पडताळणीचे काम सुरु असून ज्यांनी पात्रता नसतानाही लाभ घेतलेला आहे अशांना पहिल्या हप्त्यापासून ही रक्कम केंद्र सरकारला परत करावी लागणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा महसूलच्या कर्मचाऱ्यांकडे ही रक्कम द्यावी लागणार आहे. जर कुणाला नव्याने सहभाग नोंदवायचा असेल तर मात्र, महसूल विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये अर्ज करताना बँक खाते,आधार आणि महसूल नोंदी व्यवस्थित भरा. एकाच लागवडीयोग्य जमिनीच्या नोंदीत एकापेक्षा जास्त प्रौढ सभासदांची नावे नोंदवल्यास या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रौढ व्यक्ती स्वतंत्रपणे लाभासाठी पात्र ठरणार आहे. काही अडचण आल्यास शेतकऱ्यांना(155261 किंवा 011-24300606) या हेल्पलाइनवर क्रमांकावर संपर्क साधता येईल.

e-KYC ची मुदत वाढल्याने दिलासा

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना e-KYC हे करावे लागणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्य़ंतची मुदत देण्यात आली होती. पण शेतकऱ्यांचा प्रतिसादच नव्हता. त्यामुळे e-KYC केल्याशिवाय 11 हप्ता मिळणार नाही असे धोरण ठरविवण्यात आले होते. पण आता यामध्ये वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना 22 मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पीएम किसान योजना अनौपचारिकपणे 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती.आता या योजनेचा 11 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे.

संंबंधित बातम्या :

Latur Market: हमीभावाप्रमाणेच बाजारपेठेत तुरीचे दर, सरकारच्या निर्णयाचा परिणाम काय ? सोयाबीनचं मात्र शेतकऱ्यांनी मनावर घेतलं

Fertilizer Rate : ज्याची भीती शेतकऱ्यांना तेच घडलं, डीएपी खत दीडशे रुपयांनी महागलं

Yellow Watermelon : जे जे नवं ते बारामतीकरांना हवं, पिवळे कलिंगड पाहून काय म्हणाले मंत्री जयंत पाटील?

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.