शेतकऱ्यांनो सावधान! वेळेत शेतसारा अदा करा अन्यथा सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासनाचे’ नाव, काय आहे नेमके प्रकरण?
शेतसारा अदा करण्याकडे कायम शेतकऱ्यांचे दुर्लक्ष राहिलेले आहे. कृषीपंपाच्या थकबाकीप्रमाणेच महसूल विभागाच्या शेतसाऱ्याची अवस्था आहे. वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहिमच महावितरणने हाती घेतली आहे तर आता दुसरीकडे शेतसारा अदा करण्याचे ओझे हे शेतकऱ्यांवर राहणार आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होण्याअगोदर शेतकऱ्यांना हा शेतसारा रक्कम अदा करावी लागणार आहे.
लासलगाव : शेतसारा अदा करण्याकडे कायम (Neglect of Farmers) शेतकऱ्यांचे दुर्लक्ष राहिलेले आहे. कृषीपंपाच्या थकबाकीप्रमाणेच महसूल विभागाच्या शेतसाऱ्याची अवस्था आहे. वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहिमच महावितरणने हाती घेतली आहे तर आता दुसरीकडे (Farm Land Tax) शेतसारा अदा करण्याचे ओझे हे शेतकऱ्यांवर राहणार आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होण्याअगोदर शेतकऱ्यांना हा शेतसारा रक्कम अदा करावी लागणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर थेट (State Government) महाराष्ट्र शासनाचे नाव लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत शेतसारा रक्कम अदा करण्याचे आवाहन निफाडच्या तहसीलदांरांनी केले आहे. मार्च महिन्याअखेरपर्यंत वसुली व्हावी या उद्देशाने महसूल विभागाचे कर्मचारी गावोगावी फिरत आहेत मात्र, शेतकऱ्यांकडून शेतसारा अदा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
नियम काय सांगतो?
वेळेत शेतसारा अदा व्हावा म्हणून सध्या वसुली मोहिम ही सुरु आहे. त्याअनुंशांने शेतकऱ्यांनी वेळेत रक्कम अदा केली नाही तर नोटीस बजावली जाते. यानंतरही कर अदा केला नाही तर सक्तीच्या वसुलीच्या कारवाईला सुरवात केली जाते. या कारवाईला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 176 ते 182 अन्वये कायदेशीर असा आधार आहे. पहिल्या नोटीसनंतर दुसरी नोटीस ही जंगम मालमत्ता आणि त्यानंतर स्थावर मालमत्ता. एवढे करुनही जर खातेदाराने कर अदा केला नाही तर मात्र, स्थावर मालमत्ता जप्त होते म्हणजेच खातेदाराच्या उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव लागते. यानंतरही शेतकऱ्यांनी कर अदा केला नाही तर मात्र सदर मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जात असल्याचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले आहे.
निफाड तालुक्यात कारवाईला सुरवात
शेतकऱ्यांनी शेतसारा अदा करावा म्हणून निफाड तालुक्यात वसुलीला सुरवात झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत शेतसारा हा अदा करुन घेण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा कर वेळेत भरणे गरजेचे आहे. अन्यथा सक्तीच्या वसुलीला सुरवात केली जाणार आहे. सध्या महसूलचे कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन वसुली करीत आहेत.
थकबाकीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष
बिगरशेती खातेदाराकडे शेतसारा, बिनशेती सारा तसेच अनधिकृत बिनशेती दंड, लॉन्स, मोबाईल टावर, पंप यांच्याकडे महसुलाची रक्कम थकली असल्याने या थकबाकीदारांना वेळोवेळी नोटीस पाठवून देखील खातेदार याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या महसूलकडून नोटीसा तर बजावण्यात आल्या आहेत. भविष्यात शेतकरी शेतसारा अदा करणार का कारवाईला सामोरे जाणार हे पहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
4 हेक्टर शेतातून लाखोंचं उत्पादन, युवा शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग; अमरावतीच्या शेतकऱ्याचं कौतुक
मटण म्हणलं की तोंडाला पाणी सुटलंच समजा, पण उस्मानाबादी मटण म्हणजे… आss..हाss..हाss..!