उत्पादकता हरभऱ्याची की शेतकऱ्यांच्या नुकसानीची, कृषी विभागाच्या अहवालामुळे शेतकरीही चक्रावले!
कृषी विभागाने जाहीर केलेल्या उत्पादकतेमुळे खरेदी केंद्रावर किती शेतीमालाची खरेदी करुन घ्यावयचे हे ठरले जाते. गतआठवड्यात कृषी विभागाने हरभरा या रब्बी हंगामातील मुख्य पिकांची उत्पादकता जाहीर केली आहे. यंदाच्या पोषक वातावरणामुळे उत्पादन अधिक होणार हे स्पष्ट आहे. असे असातानाही मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उत्पादकता ही कमी ठरविण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादकतेनुसारच आता खरेदी केंद्रावर माल स्वीकारला जाणार आहे.
औरंगाबाद: (Agricultural Department) कृषी विभागाने जाहीर केलेल्या उत्पादकतेमुळे खरेदी केंद्रावर किती शेतीमालाची खरेदी करुन घ्यावयचे हे ठरले जाते. गतआठवड्यात कृषी विभागाने (Chickpea Crop) हरभरा या रब्बी हंगामातील मुख्य पिकांची उत्पादकता जाहीर केली आहे. यंदाच्या पोषक वातावरणामुळे उत्पादन अधिक होणार हे स्पष्ट आहे. असे असातानाही (Marathwada) मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उत्पादकता ही कमी ठरविण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादकतेनुसारच आता खरेदी केंद्रावर माल स्वीकारला जाणार आहे. कृषी विभागाने जाहीर केलेल्या उत्पादकतेचा फायदा हा शेतकऱ्यांना व्हावा हे अपेक्षित असताना मात्र, उस्मानाबादसाठी केवळ 6 क्विंटल 50 किलो हे एकरी नव्हे तर हेक्टरी दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त उत्पादन झाले तर विक्री करावे कुठे असा सवाल आहे. शिवाय यंदा खुल्या बाजारपेठेपेक्षा केंद्र सरकारने उभारलेल्या खरेदी केंद्रावरच अधिकचा दर आहे. असे असाताना विक्रीसाठी मर्यादा आल्या तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेशिवाय पर्यायच राहणार नाही.
काय आहे नियम?
खरेदी केंद्रावर शेतीमालाची विक्री करीत असताना पीकपेरा हा जोडावा लागतो. यामध्ये त्या पिकाची नोंद असली तर शेतकऱ्यांचा माल स्वीकारला जातो. शिवाय जी उत्पादकता ठरवून दिली आहे त्याच पध्दतीने खरेदी होते. समजा उस्मानाबाद जिल्ह्यातील हरभऱ्याची उत्पादकता ही हेक्टरी 6 क्विंटल 50 किलो असेल आणि प्रत्यक्षात यापेक्षा जास्त माल शेतकरी घेऊन आला तर केवळ 6 क्विंटल 50 किलोचीच खरेदी केली जाते. मुळात उत्पादकताच कमी जाहीर केल्याने शेतकऱ्यांना या समस्येला सोमोरे जावे लागणार आहे.
खरेदी केंद्र अन् बाजारपेठेतील दरात तफावत
नाफेडच्या माध्यमातून तूर पाठोपाठ आता रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी राज्यात खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर 5 हजार 230 तर खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला 4 हजार 500 ते 4 हजार 600 पर्यंतचा दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात विक्री केली तर क्विंटलमागे 700 रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा खरेदी केंद्राकडेच राहणार आहे. मात्र, उत्पादकतेनुसार विक्री म्हणले तर संपूर्ण मालाची विक्री शेतकऱ्यांना करता येणार नाही.
काय आहे राज्यातील हरभऱ्याची उत्पादकता?
अशी आहे राज्यातील हरभऱ्याची अंदाजित उत्पादकता दरवर्षी पीक कापणीपूर्वी कृषी विभागाकडून उत्पादकता ठरवली जाते. त्यानुसार पीकाचे नियोजन केले जाते. उत्पादकता ही क्विंटलमध्येच मोजली जाते. यामध्ये परभणी : 8.20, हिंगोली :11.00, नांदेड : 11.50, लातूर : 13.50, उस्मानाबाद: 6.5, बीड: 9.5, जालना:13.00, औरंगाबाद: 5.80, बुलडाणा: 11.80, अकोला : 15.00, वाशिम : 7.00, यवतमाळ: 12.00, अमरावती: 15.60, नागपूर : 15.00, भंडारा: 8.00, गोंदिया: 8.10, चंद्रपूर: 7.50, गडचिरोली 4.7, नाशिक: 9.50, धुळे 10.97, नंदूरबार: 13.96, जळगाव: 13.00, नगर: 7.5, पुणे : 8.60, सोलापूर:6.50, सातारा : 9.25, सांगली: 11.6, कोल्हापूर : 12.00, ठाणे 7.10, पालघर:7.50, रायगड: 4.50 तर रत्नागिरी 4.90 अशी उत्पादकता आहे.
संबंधित बातम्या :
Photo Gallery : ‘ते’ दोन तास अन् शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चकणाचूर, कांदा नगरीत झालं तरी काय?
Cotton : …म्हणूनच कापसाचे दर वाढले, कृषी विभागाच्या पीक कापणीच्या प्रयोगात काय समोर आले?
देगावच्या शिवारात रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार, तरुण शेतकऱ्यांचा उत्साह शिघेला