पावसाची उघडीप तरीही द्राक्ष बागा धोक्यातच, काय आहे शेतकऱ्यांसमोरील नवे संकट?

खतांच्या बाजारातल्या वाढत्या किमती पाहून द्राक्ष बागांची जोपासना करायची की सोडून द्यायची अशी अवस्था शेतकऱ्यांची होत आहे. रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या गॅसचा तुटवडा भासत असल्याने किंमतीत वाढ होत असल्याचे खत विक्रेते सांगत आहेत. मात्र, एकीकडे पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान अन् दुसरीकडे खतांच्या वाढत्या किंमती यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे.

पावसाची उघडीप तरीही द्राक्ष बागा धोक्यातच, काय आहे शेतकऱ्यांसमोरील नवे संकट?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 2:21 PM

लासलगाव : पावसाच्या उघडीपीनंतर द्राक्ष फळबागांचे व्यवस्थापन किंवा घ्यावयाची काळजी याबाबत कृषितज्ञांपासून ते कृषी सहाय्यकापर्यंत सर्वजण मार्गदर्शन करतात. एवढेच काय तर रासायनिक खतांची यादीही देतात. पण या खतांच्या बाजारातल्या वाढत्या किमती पाहून (damage to vineyards) द्राक्ष बागांची जोपासना करायची की सोडून द्यायची अशी अवस्था शेतकऱ्यांची होत आहे. (Chemical fertilizers) रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या गॅसचा तुटवडा भासत असल्याने किंमतीत वाढ होत असल्याचे खत विक्रेते सांगत आहेत. मात्र, एकीकडे पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान अन् दुसरीकडे खतांच्या वाढत्या किंमती यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

खतांच्या किमंतीमध्ये 300 रुपयांनी वाढ

रासायनिक खतावरच पिकांची उत्पादकता अवलंबून आहे. यातच वातावरणातील बदल आणि अनियमित पाऊसमुळे कीड-रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता नाशिक जिल्ह्यासह राज्यातील द्राक्ष बाग अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फवारणीशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्यायच नाही. पण गतवर्षीपेक्षा रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये तब्बल 300 रुपयांनी वाढ झाली आहे. असे असताना आता तुटवडा भासू लागला आहे.

यामुळे खतांच्या दरावर परिणाम

आता पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा फवारणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे. मात्र, खतांच्या किमती वाढल्याने उत्पादनावर केलेला खर्च तरी पदरी पडतो की नाही अशी आवस्था झाली आहे. कारण खतासाठी आवश्यक असलेल्या गॅसचाच पुरवठा होत नाही. कोरोना महामारी मुळे कंपनीकडे उपलब्ध होत नसल्याने रासायनिक खताचे उत्पादन घटले असल्याने रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत 300 रुपयांनी वाढ झाली आहे. एक तर अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण याचा फटका शेतकऱ्यांना बसत असताना रासायनिक खताची किमतीत वाढ झाल्याने नक्कीच शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

तरीही शेतकऱ्यांसमोरील प्रश्न कायमच

दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकऱ्यांची झालेली अवस्था ही वेगळीच आहे. पावसाने उघडीप दिली म्हणजे सर्वकाही सुरळीत असे नाही. वातावरणातील बदलामुळे पिकांचे जे नुकसान कसे भरुन काढावे हा प्रश्न कायम आहे. कारण कीड आणि रोगराईने द्राक्ष बागांना घेरलेले आहे. त्यामुळे किडनाशक तसेच बुरशीनाशक फवारल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच नाही. मात्र, खतांच्या किंमती वाढल्याने फवारणीची कामे होतात की नाही प्रश्न आहे. शिवाय एवढे करुनही पुन्हा अवकाळी बरसला तर काय करायचे असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत.

कृषिमंत्र्यांनी तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी

मध्यंतरीच्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे झालेले आहे. शिवाय राज्य कृषिमंत्री याच जिल्ह्यातील असल्याने त्यांना येथील शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात येण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांनी योग्य नुकसानभरपाई तर द्यावीच शिवाय खतांच्या वाढत्या दरावर काहीतरी तोडगा काढण्याची मागणी शेतरकऱ्यांना केली आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : प्रतिक्षा संपली यादीत नाव तपासा अन् खात्री करुन घ्या, सन्मान निधी योजनेतील 10 हप्त्याची

द्राक्षाचे नुकसान प्रशासकीय यंत्रणेमुळेच, आस्मानी संकटाला प्रशासनाकडून ‘पाठबळच’

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.