DAP खतांवरील सबसिडी गेमचेंजर ठरणार? शेतकरी मोदी सरकारवर खुश होतील?
केंद्र सरकारनं डीएपी खतावरील सबसिडी वाढवून 1211 रुपये एका पोत्यामागं केली आहे. Fertilizer subsidy Central Government
नवी दिल्ली: शेती, शेतकरी आणि शेती सुधारणा कायदे यांच्यामुळे केंद्र सरकारपुढे अडचणी निर्माण होत आहेत. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाला आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. या मुद्यांमुळे केंद्र सरकारची शेतीप्रश्नी अडचण झाल्याचं दिसून आलं होतं. डीएपी आणि इतर खतांच्या किमतीवरुन विरोधकांनी केंद्रावर निशाणा साधल्यानंतर खतांवरील सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सबसिडी 31 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारनं डीएपीवर दिलेल्या सबसिडीच्या पोस्ट भाजप नेते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. खतांवरील वाढवलेली सबसिडी ऐतिहासिक निर्णय म्हणत आहेत. मात्र, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं करणार याविषयी कोणतीही माहिती मिळताना दिसत नाही. (Fertilizer subsidy increased by Central Government can gamechanger Will farmers be happy with this decision )
डीएपीच्या एका पोत्यावर 1211 रुपये सबसिडी
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत वाढून आणि आपण आयातीवर अवलंबून असल्यानं डीएपीच्या किमती वाढल्या होत्या. 1711 वरुन 2411वर डीएपीची किंमत पोहोचली होती. पूर्वीची सबसिडी 511 राहिली असती तर शेतकऱ्यांना 1900 रुपये द्यावे लागले असते. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सबसिडी वाढवून 1211 रुपये केली आहे. शेतकऱ्यांवर आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याचा बोजा पडणार नाही,असं त्यांनी म्हटलं आहे.
खतांच्या सबसिडीवर किती खर्च किती?
नरेंद्र सिंह तोमर यांनी केलेल्या द्याव्यानुसार केंद्र सरकार रासायनिक खतांवर यापूर्वी 80 हजार कोटी रुपये अनुदान देत होतं. आता डीएपीवरील सबसिडी 14 हजार 775 कोटी रुपये वाढवली आहे. आता एकूण 94 हजार 775 कोटी रुपये अनुदान केंद्र सरकार खतांवर खर्च करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना 1200 डीएपी खत उपलब्ध होईल, असं नरेंद्र तोमर म्हणाले.
भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजकुमार चाहर यांनी टीव्ही 9 डिजीटलशी बोलताना आम्ही आमच्या संघटनेच्यावतीनं केंद्र सरकारच्या यानिर्णयाचे फायदे गावोगाव पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी सरकार सातत्यानं शेतकरी हितांसाठी निर्णय घेत आहे. त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काम केलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत, असं देखील ते म्हणाले.
Onion Price Today: कांद्याला समाधानकारक भाव, शेतकऱ्यांना थोडासा दिलासाhttps://t.co/Xjxb4yOW7F#Nashik | #Onion | #APMC | #Onionprice
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2021
संबंधित बातम्या:
खतांवरील अनुदान कसं मिळणार?, DAP खत 1200 रुपयांना कसं मिळवायचं? ही कागदपत्रं आवश्यक
Onion Price Today: कांद्याला समाधानकारक भाव, शेतकऱ्यांना थोडासा दिलासा
(Fertilizer subsidy increased by Central Government can gamechanger Will farmers be happy with this decision )