स्वप्न सत्यामध्ये : शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता, 1 किलोमीटरला 24 लाख रुपये

महाविकास आघाडी सरकारने चार महिन्यापूर्वीच मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून शेत रस्त्यांचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतरस्ते नसल्यामुळे शेतीमालाची वाहतूक करणे मुश्किल होत आहे. शिवाय ऊसासारखे नगदी पीकही केवळ वाहतूकीमुळे घेता येत नाही. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभे राहणे गरजेचे होते.

स्वप्न सत्यामध्ये : शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता, 1 किलोमीटरला 24 लाख रुपये
पाणंद रस्ता उभारणीसाठीचा आराखडा राज्य सरकराने तयार केला असून लवरच प्रत्यक्ष कामांनाही सुरवात होणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 11:33 AM

उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने (State Government) चार महिन्यापूर्वीच मातोश्री ग्रामसमृध्दी (Farm Road) पाणंद रस्ता योजनेतून शेत रस्त्यांचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतरस्ते नसल्यामुळे (Transportation Good) शेतीमालाची वाहतूक करणे मुश्किल होत आहे. शिवाय ऊसासारखे नगदी पीकही केवळ वाहतूकीमुळे घेता येत नाही. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभे राहणे गरजेचे होते. पण आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष रस्ते बांधणीला सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मान उस्मानाबाद जिल्ह्यातील 64 रस्त्यांना मिळाला आहे. शिवाय 1 किलोमीटरसाठी 24 लाखाचा निधी असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे. शिवाय एमआरईजीएसच्या कुशल-अकुशल नियमांच्या कचाट्यातून पाणंद रस्त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 64 पाणंद रस्त्यांना मंजूरी

शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात पायी मार्गस्थ होणेही मुश्किल होत असत. शेतीमालाची वाहतूकही करता येत नसल्याने मोठे नुकसान होत असत. आता मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातील 64 रस्त्यांसाठी मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात शेकडो शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गा लागलेला आहे.

अशी आहे मंजूर झालेल्या रस्त्यांची यादी

उस्मानाबाद जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये हे रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक रस्ते कळंब तालुक्यात 28 तर उमरगा 18, तुळजापूर 5, भूम 03, उस्मानाबाद 3 आणि लोहारा 4 व वाशी तालुक्यातील रस्त्यांची संख्या आहे 03 यामुळे शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 64 रस्त्यांना मंजूरी मिळालेली आहे. जिल्हाधिकारी यांनी शेतरस्ते मोकळे करण्याची मोहीम राबवल्याने या योजनेला अधिक बळ मिळाले आहे.

1 किलोमीटरसाठी 24 लाख रुपये

आता पक्के शेतरस्तेच झाले नाहीत. एमआरईजीएस अंतर्गत एका किलोमीटरसाठी 5 लाख रुपयेही मिळत नव्हते. मात्र, या योजनेतून भरीव निधी आहे. त्यामुळे शेतरस्त्यांचे काम हे दर्जेदार होणार आहे. शिवाय उर्वरीत रस्ते उभारणीसाठी लवकरच प्रयत्न केले जाणार असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे. 64 रस्त्यांची लांबी ही जवळपास 84 किमी राहणार असून याला मान्यता मिळाली आहे.

संबंधित बातम्या :

द्राक्षाचे दर ठरले अन् मोडले, आता पपईच्या निर्णयाचे काय होणार? व्यापाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष..!

Grape : ज्याची भीती होती तेच झाले, आता द्राक्ष उत्पादकांसमोर एकच पर्याय, काय स्थिती आहे द्राक्षांच्या पंढरीत, वाचा सविस्तर

Positive News: खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामातून भरुन निघणार..! सोयाबीनला फलधारणा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.